लोकांना मदत करणाऱ्या सोनू सूदच्या नावाने ‘या’ पठ्ठ्याने सुरू केली मोफत रुग्णवाहिका सेवा

0

 

कोरोनाच्या संकटात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. त्याने लॉकडाऊनमध्ये अनेक स्थलांतरित मजूरांना, गरजूंना त्याने मदत केली. त्यामुळे तो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सोनू सूदने लोकांना मदत केलेली पाहून एक तरुण इतका प्रेरित झाला आहे की, त्याने गरिबांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु केली आहे. या तरुणाचे नाव शिवा असून तो हैद्राबादचा राहणारा आहे.

हैद्राबादमधल्या हुसैन सागर तलावात आत्महत्या करणाऱ्या लोकांना वाचवणारा तरुण म्हणून अशी त्याची ओळख आहे. आता त्याने सोनू सूदच्या नावाने एक मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु केली आहे.

मंगळवारी सोनू सूदच्या हातानेच या रुग्णवाहिकेचे उद्घाटन झाले आहे. शिवाने आतापर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांचे जीव वाचवले आहे. जो कोणी तिथल्या तलावात आत्महत्या करण्यासाठी येतो, त्याला वाचवण्याचा प्रयत्न शिवा करत असतो.

या कामातून मिळणाऱ्या मानधनातूनच त्याने रुग्णवाहिका सेवा सुरु केली आहे. त्याने स्वता:वर होणारा खर्च कमी केला आणि त्या पैशांनी त्याने रुग्णवाहिका खरेदी केली आहे. त्यामुळे देशभरात त्याचे कौतूक केले जात आहे.

सोनू सूद यांनी लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांची मदत केली आहे, मला त्यांच्याकडून खुप प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळेच मी रुग्णवाहिकेला सोनू सूदचे नाव दिले आहे, असे शिवाने म्हटले आहे.

या रुग्णवाहिकेच्या उद्घाटनाला सोनू सूद उपस्थित होता. त्याने मोफत रुग्णवाहिका सुरु करणाऱ्या शिवाचे कौतुक केले आहे. तसेच आजच्या समाजाला शिवासारख्या तरुणांची आवश्यकता आहे, असे सोनू सूदने म्हटले आहे.

शिवा गेल्या २० वर्षांपासून आत्महत्या करणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेकदा काही लोक त्या तलावात आत्महत्या करतात, तेव्हा पोलिसांची मदत म्हणून तो पाण्यातून त्या लोकांचे मृतदेह काढून देतो.

Leave A Reply

Your email address will not be published.