सोनू पुन्हा ठरला सुपरहिरो, १ लाख लोकांना देणार रोजगार; असा करा अर्ज अन् मिळवा नोकरी

0

कोरोनाच्या संकटात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद अनेकांसाठी देवदूत ठरला होता, त्याने अनेक स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवले होते. याचा सर्व खर्च त्याने स्वत: केला होता. लॉकडाऊनंतरही त्याने अनेक लोकांची मदत केली, त्यामुळे तो सध्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो.

भारतात कोरोनामुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तसेच अनेकांच्या हाताला आता रोजगार नाहीये, असे असताना सोनू सूद पुन्हा आता लोकांच्या मदतीला धावून आला आहे. सोनू सूद आता बेरोजगारांना रोजगार देणार आहे. त्यामुळे आता अनेकांचे आता आयुष्य बदलणार आहे.

सोनूने आपल्या ट्विटरवरुन एक ट्विट करुन अनेकांना आनंदाची बातमी दिली आहे. त्याने १ लाख लोकांना नोकरी देण्यासाठी एक प्लॅन बनवला आहे. त्याच्या या ट्विटमुळे सगळीकडेच त्याचे कौतूक होत आहे.

नवीन वर्ष… नवीन स्वप्न… नवीन नोकरीच्या संधी आता आम्ही तुम्हाला नोकरीची संधी देणार आहे. त्यासाठी गुडवर्कर हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करा तुमचे भविष्य बदला अशा आशयाचे ट्विट सोनू सूदने केले आहे.

सोनू सूदच्या या ऍप्लिकेशनमुळे अनेकांचे आयुष्य बदलणार आहे, या ऍपच्या माध्यमातून १० कोटी लोकांचे आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सोनूचे हे ट्विट पाहून अनेकांनी त्याचे कौतूक केले आहे, तर अनेकांनी त्याचे आभार मानले आहे.

जाणून घ्या काय आहे गुडवर्कर ऍप-
गुडवर्कर हे ऍप लोकांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे. या ऍपचा उद्देश लोकांना नोकरी मिळवून देणे आणि त्यांच्या करियरसाठी सहकार्य करणे असा आहे. हे ऍप पुर्णपणे सुरक्षित असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

हे ऍप कसे काम करणार-
सुरुवातीला तुम्हाला गुडवर्कर ऍप तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर या ऍपवर तुमचा बायोडाटा तयार करावा लागणार आहे, हे सर्व मोफत असणार आहे. विशेष म्हणजे हा बायोडाटा तुम्ही तुमच्या भाषेत बनवू शकतात.

पुढे हा बायोडाटा इंग्रजी भाषेत भाषांतर केले जाणार आहे, त्यानंतर तो बायोडाटा कंपन्यांकडे पाठवला जातो. या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला जवळ असणाऱ्या कंपनीतल्या नोकरीबद्दल माहिती दिली जाणार आहे.
तसेच एखाद्या कंपनीत जर तुमची निवड झाली, तर तुमची मुलाखत कधी होणार, कशी होणार, पगार किती असेल याबाबतची सर्व माहिती देण्यात येणार आहे. हे ऍप लोकांनासाठी चांगलेच फायद्याचे ठरणार असून त्यासाठी लोकांनी आता सोनू सूदचे आभार मानले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.