जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून व कसलीही शिकवणी न लावता ती पहिल्याच प्रयत्नात झाली IAS

0

आज आम्ही तुम्हाला एका मुलीची यशोगाथा सांगणार आहोत जिने जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. तिचे नाव आहे सुरभी गौतमी. काही मुलं लहानपणापासूनच हुशार असतात. त्यांना आपले ध्येय माहीत असते.

लहानपणापासून त्यांना भविष्यात काय करायचे आहे हे माहीत असते. अशीच सुरभी गौतमीची कहाणी आहे. अवघड असणाऱ्या आयईएस परिक्षेत सुरभीने पुर्ण भारतातून पहिला नंबर मिळवला आहे. आणि त्यानंतर आता २०१६ साली सुरभी संपुर्ण भारतात ५० वी रँक मिळवून आयएएस पास झाली आहे.

सुरभीचे वडील हे वकीली करतात. ते मैहर सिवील कोर्टात वकील आहेत आणि तिची आई डॉक्टर सुशीला गौतम अमदरा येथे शाळेत शिक्षिका आहे. सुरभी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. दहावीत सुरभीने ९३.४ टक्के एवढे गुण मिळवले होते.

हेच ते गुण आहेत ज्यामुळे सुरभीला वाटले की आपण काहीतरी मोठे करू शकतो. त्यानंतर सुरभीने कलेक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. यानंतर सुरू झाला तिचा आयएएस होण्याचा प्रवास. सुरभीचे लहानपण सर्व मुलांसारखे सामान्यच होते.

मुळची एका छोट्या खेड्यातून आलेली सुरभी अभ्यासात हुशार होती. सुरभीचे अमदरा हे छोटेसे गाव आहे. अमदरा येथून तिने १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ज्या शाळेत मुलभूत सुविधासुद्धा नव्हत्या त्या शाळेत तिने आपले सुरूवातीचे शिक्षण पुर्ण केले.

तिचे परिपुर्ण शिक्षण त्यामुळे दूर राहिले. तिथे वीज आणि पाण्याची खुप टंचाई होती. लहानपणी तिने दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला आहे. बारावी नंतर तिने इंजिनिअरींगला प्रवेश घेतला आणि तिने तिथेही चांगले गुण मिळवले.

त्यानंतर सुरभीने भोपाळ येथून इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशनची पदवी संपादन केली. इथेही तिने पहिला नंबर मिळवला. पुर्ण विद्यापिठात तिचा पहिला नंबर आला होता. त्यानंतर सुरभीने बार्कमध्ये वैज्ञानिक म्हणून काम केले. त्यानंतर तिने अनेक परिक्षा दिल्या.

SAIL, GATE, ISRO, MPSC PRE, SSC LGL, delhi police आणि FCI अशा अनेक परिक्षा तिने चांगल्या मार्कांनी पास केल्या. २०१३ मध्ये तिने आयईएस परिक्षेत संपुर्ण भारतात पहिला नंबर मिळवला. त्यानंतर तिने आयएएस परिक्षेत पुर्ण भारतात ५० वा नंबर पटकावला आणि ती आता आयएएस झाली आहे.

सुरभीप्रमाणे यश मिळवणे काही सोपी गोष्ट नाही. तिने परीक्षासुद्धा पहिल्याच प्रयत्नात पास केली आहे. सुरभीची स्वप्ने खुप मोठी आहेत. तिने सांगितले की तिला या सगळ्याची प्रेरणा तिच्या आई बाबांकडून मिळाली आहे. सुरभीने कधीही कोणत्या गोष्टीसाठी शिकवणी लावली नाही.

स्वता अभ्यास करून तिने सगळ्यांना चकीत केले आहे. शाळेत तिला अनेकवेळा वेळेवर पुस्तके मिळत नव्हती. म्हणून तिला मोठे काम करण्याची प्रेरणा मिळाली. तिचा हा प्रेरणादायी प्रवास अनेक मुलींसाठी आणि मुलांसाठी एक आशेचा किरण ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.