रियल नायक! २४ जानेवारीला फक्त एक दिवसासाठी ही मुलगी होणार राज्याची मुख्यमंत्री

0

 

बॉलिवूडचा नायक चित्रपटचा विषय निघाला, तर आपल्या चेहऱ्यासमोर लगेच एक दिवस मुख्यमंत्री झालेला अनिल कपुर लगेच आपल्या डोळ्यासमोर येतो. एक दिवसाच्या कार्यकाळात तो अनेक मोठे निर्णय घेतो. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना काढून टाकतो आणि अनेक गरिबांची तो कामे करतो.

अशा अनेक गोष्टी आपण नायक चित्रपटात पाहिल्या आहे, पण आता उत्तराखंडच्या एका मुलीला एक दिवसाचे मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. या मुलीचे नाव सृष्टी गोस्वामी असे आहे.

हरिद्वारच्या दौलतपुरमध्ये राहणाऱ्या सृष्टीला २४ जानेवारीला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळणार आहे. सृष्टी एक दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री बनणार आहे.

२४ जानेवारीला राष्ट्रीय कन्या दिन आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये एक दिवसासाठी बाल मुख्यमंत्री म्हणून सृष्टी मुख्यमंत्री बनणार आहे. त्यानंतर सर्व विभागाचे अधिकारी त्यांच्या विभागाचा कार्य अहवाल सृष्टीसमोर सादर करणार आहे.

सृष्टी ही दौलतपुरची रहिवासी आहे. ती सध्या बीएमएम पीजी कॉलेजमधून एग्रीएल्चरचे शिक्षण घेत आहे. बाल विधानसभेत दर तीन वर्षांनी बाल मुख्यमंत्र्याची निवड केली जाते.

सृष्टीने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून, त्यात तिने तिची निवड मुख्यमंत्रीपदासाठी झाली असल्याचे सांगितले आहे. आपली मुलगी मुख्यमंत्री बनणार असल्याने आम्हाला तिचा खुप अभिमान वाटतो आहे, असे तिच्या आई वडिलांनी म्हटले आहे.

१२० नंबरच्या खोलीत बाल विधानसभेची बैठक आयोजित करण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी मान्यता दिली आहे. तसेच त्यासंबंधित विभागीय अधिकाऱ्यांना आदेशही दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.