देशातील दोन हुशार विद्यार्थ्यांमध्ये आला पुण्याचा १५ वर्षाचा श्लोक आणि बनला केबीसीचा एक्सपर्ट

0

 

अमिताभ बच्चन सुत्रसंचालन करत असलेला टिव्हीवरील प्रचंड लोकप्रिय आणि चर्चेतील शो म्हणजे कौन बनेगा करोडपती (केबीसी). सध्या या शोचे १२ वे सीजन सुरु आहे. हा आठवडा स्टुडंट स्पेशल वीक म्हणून साजरा केला जाणार आहे.

या आठवड्यात सर्व विद्यार्थी स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. इतकेच नाही तर केबीसीचे एक्सपर्ट म्हणून पण अशा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली ज्यांनी वंडर किड किंवा जिनियस विद्यार्थी म्हणून देशभरात आपली ओळख निर्माण केली आहे.

केबीसीचे एक्सपर्ट म्हणुन देशभरातील दोन हुशार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. एक हरियाणातील गुगल बॉय कौटील्य आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्रातील पुण्याचा श्लोक सँड. अवघ्या १५ वर्षाचे वय असणाऱ्या श्लोकची केबीसी एक्सपर्ट म्हणून निवड झाल्याने राज्यभरातून त्याचे कौतुक केले जात आहे.

पुण्यात राहणारा श्लोक सध्या पुण्याच्याच बिशप स्कुलमध्ये शिकत आहे. ९ वीत शिकणाऱ्या श्लोकने देशभरात आपली ओळख क्विझ मास्टर, गणितातील तज्ञ आणि स्टोरी टेलर म्हणून निर्माण केली आहे.

विशेष म्हणजे श्लोकला कुठलाही प्रश्न विचारा त्याला त्या प्रश्नाचे उत्तर माहित असते. तसेच फक्त उत्तरच नाही, तर त्या उत्तरासंदर्भातील माहिती असते. इथे गुगलप्रमाणे त्याचा मेंदु काम करतो असे म्हणायला हरकत नाही.

वयाच्या चौथ्या वर्षापासुन त्याने वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे वेगवेगळ्या विषयातील ज्ञान थक्क करणारे आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन त्याच्या शाळेने श्लोकच्या नेत्वृत्वाखाली देशातील मोठमोठ्या क्विझ स्पर्धा जिंकल्या आहे.

गेल्या अनेक वर्षांपासुन शाळेतील बेस्ट स्टुडेंटचा मानकरी तो ठरत आहे. तसेच वयाच्या नवव्या वर्षी अबॅकस ग्रँडमास्टरचा पुरस्कार मिळवत सर्वात लहान वयात ग्रँडमास्टर बनण्याचा विक्रम पण त्याने स्वता:च्या नावावर केला आहे.

श्लोक मेंटल मॅथ्समध्ये एक्सपर्ट आहे. तसेच तो कॉम्पुटर तज्ञ आहे सोबतच तो मैदानाच्या खेळातही अग्रेसर आहे. वकृत्व स्पर्धेत पण तो भाग घेत असतो, विशेष म्हणजे ज्या भाषेत तो भाषण करतो त्यांची पुर्ण माहिती त्याला असते.

केबीसीमध्ये जेव्हा एक्सपर्ट म्हणुन त्याची निवड झाली तेव्हा खुद्द अमिताभ बच्चनेच त्याचा परिचय क्विझ मास्टर आणि गणितातील तज्ञ म्हणुन करुन दिला होती. या निवडीवर बोलताना मी विद्यार्थ्यांची पुर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न करेल, असे श्लोकने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.