अभिमानास्पद! गवंड्याची मुलगी झाली केंद्रीय पोलिस दलामध्ये भरती, आई-वडीलांचे पाणावले डोळे

0

 

परिस्थिती कशीही असो, जर आपण ध्येयाच्या मागे धाव घेत मेहनत केली तर नक्कीच आपण आपल्याला यश मिळते, हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हे सिद्ध करुन दाखवले आहे शिवानी शहाजी पाटील हिने.

शिवानी वाळवा तालुक्यातील ठाणापुडे गवंडी काम करणाऱ्या शहाजी पाटील यांची मुलगी आहे. शिवानीच्या अथक प्रयत्नांमुळे ती केंद्रीय पोलीस दलात नियुक्ती झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी शिवानीचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला आहे.

आपल्या मुलीचा आणि आपल्या मुलींमुळे आपला सत्कार झालेला पाहून शिवानीचे आईवडील भावून झाले आहे. शिवानीची निवड स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून झाल्याने तिचा ठाणापुडच्या ग्रामस्थांकडून इस्लामपुरच्या  मुक्तांगणच्या संचालिका वर्षाराणी विनोद मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला.

शहाजी आणि सुनंदा पाटील यांची शिवानी एकुलती एक कन्या आहे. घरात मतिमंद मुलगा असताना त्याला सांभाळत तिच्या आईवडिलांनी शिवानीला शिक्षण दिले.

देववाडी येथून तिने माध्यमिक शिक्षण घेतले होते. तसेच महाविद्यालयातील शिक्षण इस्लामपूरमधील के आर महाविद्यालयात सुरू असतानाच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती.

आईवडील निरक्षर भाऊ मतिमंद, कौटुंबिक अडचणी अशी तिची परिस्थिती होती. तिला आपल्या परिस्थिती जाणीव होती, तसेच आपल्या आईवडीलांचे कष्ट बघून तिने आपले ध्येय निश्चित केले आणि मेहनत घेऊन यशस्वी वाटचाल करत उंच भरारी घेतली आहे. त्यामुळे सगळीकडून तिचे कौतुक केले जात आहे.

ठाणापुडे गावातील तरुणाईने विविध क्षेत्रात कौतुकास्पद काम केले आहे. शिवानी आता केंद्रीय पोलीस दलात निवड झाली आहे, त्यामुळे आता त्या लोकांच्या यादीत शिवानी पाटील हिचेही नाव आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.