नोकरी सोडून व्यवसाय सुरु करण्यास आईने केली मदत, आता भाऊ-बहिण खीर विकून कमवताय करोडो रुपये

0

 

 

भारतीय संस्कृतीत खीरला अनन्य साधारण महत्व आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारची खीर बनवली जाते, अशात जर ती खीर आपल्या आईच्या हातांनी असेल तर एक प्रकारचे स्वर्गसुखच आपल्याला मिळते.

आज आम्ही तुम्हाला अशा दोन बहिण-भावाची गोष्ट सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या आईच्या खीरीला देशभरात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. या दोन भाऊ-बहिणने खीर विकण्याचा व्यवसाय सुरु करुन आता त्या व्यवसायापासून करोडो रुपयांची कमाई करत आहे.

पुण्यात राहणाऱ्या या तरुणाचे नाव शिवांग सूद असे आहे, तर त्याच्या बहिणीचे नाव शिविका सूद असे आहे. त्यांनी २०१८ मध्ये ‘ला खीर डेली’ (एलकेडी) नावाने खीरचा ब्रँड सुरु केला होता. आज ही पुण्याची खीर देशभरा प्रसिद्ध आहे.

मला आईने बनवलेली खीर फार आवडायची, २०१७ मध्ये माझ्या बहिणीने बनवलेली खीर आवडली नाही, त्यामुळे तिने खीरमध्ये नुटेला आणि ओरिओ टाकला, तर त्या खीरची चवच बदलली, असे शिवांगने बेटर इंडीयाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

त्यामुळे त्यांच्या आईने एक दिवशी गुलकंद आणि ब्राउनी टाकून खीर बनवली, कुटूंबाला ती खुप आवडली. तेव्हा शिवांगचे स्पोर्ट्स स्टार्ट-अप सुरु होते. त्याला वाटले कि ही खीर लोकांपर्यंत पोहचवायला पाहिजे.

त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी औंधच्या स्टारबक्सच्या बाहेर एक छोट्या दुकानात खीर विकण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी खीरमध्ये लोकांना आवडतील असे वेगवेगळे फ्लेवर्स ठेवले होते.

पहिल्या दिवशी आपल्या मित्रांच्या मदतीने त्याने ४४ खीरचे डब्बे विकले. दुसऱ्या दिवशी ८२ डब्बे त्याने विकले, तर तिसऱ्या दिवशी १०० डब्ब्यांची विक्री झाली. त्यानंतर जेव्हा त्यांनी ब्रँडींग आणि मार्केटींग सुरु केली, लोकांकडून त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला.

पुढे त्यांनी त्यांनी पुण्याच्या जेएम रोडजवळ दुकान उघडली. त्यांची पहिली कमाई ३३ लाख रुपये इतकी होती, त्यानंतर २०१८ मध्ये त्यांची कमाई ८४ लाख रुपये इतकी होती. २०१९ मध्ये आणि २०२० मध्ये तर त्यांची कमाई १ करोडपेक्षा जास्त झाली होती.
शिवांग आणि शिविका यांच्या या व्यवसाय मोठा करण्यात त्यांच्या ५२ वर्षीय आई सोनिया सुद यांचा खुप मोठा वाटा आहे. त्यांनी आपली शाळेची नोकरी सोडून मुलांना हा व्यवसाय वाढवण्यात मदत केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.