‘कुछ तो गडबड है’ म्हणत गाजवला छोटा पडदा, वाचा बँकेतला एक रोखपाल कसा बनला कलाकार

0

आज बॉलिवूड आणि छोटा पडदा गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांचा वाढदिवस. चाहते त्यांना एसीपी प्रत्युमन म्हणून ओळखतात. त्यांनी ही भुमिका सोनी चॅनेलवरील प्रसिद्ध मालिका सीआयडी या मालिकेत निभावली होती. त्यांची ही भुमिका सर्वांनाच खुप आवडली होती.

त्यांना अनेक मराठी चित्रपटातही अनेक अभिनय गाजवले आहेत. सांगायचेच झाले तर दे धक्का या प्रसिद्ध चित्रपटातील त्यांच्या भुमिकेने धुमाकूळ घातला होता. त्यातला त्यांचा ‘तु माणूस आहेस की सैतान’ हा डायलॉग खुप गाजला होता. आजही हा चित्रपट अनेकांच्या आवडीचा चित्रपट आहे.

पण बऱ्याच जणांना माहित नाही की अभिनयाच्या क्षेत्रात येण्याच्या आधी शिवाजी साटम हे एका बॅंकेत काम करायचे. ते सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये रोखपाल म्हणून काम पाहायचे. नोकरी सांभाळता सांभाळता त्यांनी थेअटरमध्ये काम करण्यास सुरूवात केली होती.

खुप काळ थिएटरमध्ये काम केल्यानंतर अखेर त्यांना पहिली टीव्ही मालिका मिळाली. त्यांनी सर्वात आधी रिश्ते-नाते या मालिकेतून अभिनयाची सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी बऱ्याच टीव्ही सिरीअल्समध्ये अभिनय केला. पण त्यांना सर्वात जास्त यश सीआयडी या मालिकेतून मिळाली होती.

सीआयडी ही मालिका सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युम्नची भुमिका साकारली होती जी आजही खुप प्रसिद्ध आहे. यानंतर त्यांना खुप यश मिळाले. त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पन केले.

सर्वात आधी त्यांनी गुलाम ए मुस्तफा या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर सुर्यवंशम, वास्तव, पुकार, नायक, गर्व आणि टॅक्सी नंबर ९२११ यांसारख्या अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.

शिवाजी साटम यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. जरी ते सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब असले तरी त्यांची प्रसिद्धी कणभरसुद्धा कमी झालेली नाही. शिवाजी साटम यांच्यासारखा अभिनेता पुन्हा होणे नाही.

त्यांनी केलेले अभिनय दुसऱ्या कोणत्याच अभिनेत्याला जमणारच नाहीत कारण ते त्यांच्यावरच सुट करतात. अशा शिवाजी साटम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या भावी आयुष्यास त्यांना शुभेच्छा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.