फॅशन इंडस्ट्री सोडून करतेय गावरान तुपाची निर्मिती, वर्षाला करतेय २४ लाखांची उलाढाल

0

 

 

सध्या प्रत्येकालाच फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करायचे आहे. या इंडस्ट्रीत काम करणारे लोक नाव आणि पैसा दोन्ही कमवत आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेची गोष्ट सांगणार आहोत जिने ही इंडस्ट्री सोडून गायीचे तुप विकण्यास सुरु केले आहे. आज याच व्यवसायातून ही महिला लाखोंची रुपयांची उलाढाल करत आहे.

शिप्रा शांडिल्य हे ९० च्या दशकातले फॅशन इंडस्ट्रीत खुप मोठे नाव होते. त्यांनी सुमारे १९ वर्षे फॅशन इंड्स्ट्रीत काम केले. एके दिवशी अचानक त्यांनी गावी म्हणजेच बनारसला परतण्याचा निर्णय घेतला.

शिप्रा यांनी बनारला येऊन इतर महिलांना हाताशी घेऊन एक फर्म बनवली. आता ते या फर्मच्या माध्यामातून त्यांनी गायीच्या तुपापासून वेगवेगळे पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. सध्या शिप्रा या १२ वेगवेगळे पदार्थाचे पदार्थ बनवत आहे. त्यांच्या पहिल्या वर्षाचा टर्न ओव्हर २४ लाख रुपये इतका आहे.

शिप्रा यांनी १५ महिलांना रोजगार दिला आहे. तसेच त्या ४५० शेतकऱ्यांशी त्या संपर्कात असून त्यांच्याकडून शिप्रा यांना ३० हजार लीटर गायीचे दूध पुरवतात.

हा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी १० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांनी या कंपनीची सुरुवात २०१९ मध्ये केली होती. त्यांच्या या फर्मचे नाव प्रभुती एंटरप्राईझेस असे आहे.

प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबात गाय-म्हैस असते, हे जेव्हा शिप्रा यांना कळाले तेव्हा त्यांनी घरात बनवलेले शुद्ध तुप तराय करुन विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी ५५ हजारांची दुधापासून क्रिम काढणारी मशीन विकत घेतली. याचा उपयोग करुन दुधावरची साय काढली जायची आणि प्रक्रिया करुन गायीचे शुद्ध तुप तयार करायचे.

शिप्रा प्रत्येक महिन्याला १०० किलो तुप करते. सध्या शिप्रा तीन प्रकारचे तुप तयार करत आहे. त्यात सामान्या गावराण तुप, ब्राम्ही तुप, शतावरी तुप आहे. या तुपाची किंमत १४५० ते २४६० रुपये प्रतिकिलो रुपये आहे.

तसेच त्या तुपा व्यतिरिक्त नारळ, ओट्स, हळदीपासून बिस्कि बनवण्याचे काम पण त्या करतात. त्या दरमहिन्याला ५० किलो बिस्किट तयार करतात. याची बिस्किटांची किंमत १३०० रुपयांपासून १५०० रुपये प्रतिकिलो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.