..आणि शशी कपूर यांनी मनमोहन देसाई यांना चाकू फेकून मारला होता, वाचा भन्नाट किस्सा

0

शशी कपूर असे अभिनेते होते ज्यांना अशा कलाकारांमध्ये गणले जाते जे कधीच कोणत्या वादात सापडले नाहीत. ज्यांचे कधीही कोणाशी प्रेमसंबंध चर्चेत नसायचे किंवा त्यांचे नाव कोणाशीही कधी जोडले गेले नाही.

त्यांना कपुर कुटुंबाचा देखना कपुर बोलले जायचे. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे थिएटर कलाकार होते आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले होते. त्यानंतर त्यांची मुले म्हणजे शम्मी कपूर आणि त्यांचे भाऊ राज कपूर यांनीही अभिनय क्षेत्रात काम करण्याचे ठरवले.

मग शशी कपूरही मागे राहिले नाहीत. त्यांनीही अभिनय करण्यास सुरूवात केली. शशी कपूर यांचे भाऊ राज कपूर यांच्या आवारा चित्रपटातून त्यांनी अभिनयाला सुरूवात केली. १९५१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

त्यामध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. १९६१ मध्ये चोपडा प्रोडक्शन हाऊसच्या धर्मपत्र या चित्रपटात त्यांनी मुख्य भुमिकेत काम केले होते. पण १९६२ च्या प्रेम पत्र या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली.

त्यांनी अनेक निर्मात्यांसोबत काम केले आणि त्यातीलच एक नाव होते मनमोहन देसाई. मनमोहन देसाई यांची शशी कपूर यांना नेहमी भिती वाटायची. मनमोहन देसाई आणि शशी कपूर यांचे खुप जवळचे संबंध होते.

शशी कपूर नेहमी म्हणायचे की मनमोहन देसाई मला मारू पाहत आहेत. शशी कपूर असे का म्हणायचे याचा खुलासा मनमोहन देसाई यांनी त्यांच्या चरित्र्याच्या पुस्तकात केला आहे. त्यावेळचा एक किस्साही त्यांनी सांगितला आहे.

शशी कपूर यांनी १९७३ मध्ये आ गले लग जा या चित्रपटात काम केले होते आणि १९७९ मध्ये सुहाग चित्रपटात मनमोहन देसाई यांच्याबरोबर काम केले होते. शशी कपूर यांना वाटायचे की जेव्हा मनमोहन देसाई कलाकाराला एखादा धोकादायक स्टंट करताना पाहायचे तेव्हा त्यांना खुप मजा यायची.

तसेच शशी कपूर यांनी मनमोहन देसाई यांच्यासाठी जेवढे धोकादायक स्टंट केलेत तेवढे त्यांनी कोणासाठीच केले नाही. एका सीनमध्ये शशी कपूर यांना चाकूने मारामारी करायची होती.

त्यावेळी मनमोहन देसाई म्हणाले की तुम्हाला हा सीन खऱ्या चाकूने करायचा आहे. हे ऐकून शशी कपूर यांनी नकार दिला. शशी कपूर म्हणाले की मी स्केट घातले आहेत त्यामुळे चाकू कोणालाही लागू शकतो.

यावर मनमोहन देसाई शशी कपूर यांना थेट डरपोक म्हणाले होते. तेव्हा त्यांनी मनमोहन यांच्या दिशेने चाकू फेकला पण त्यांनी हा चाकू खुप हळू फेकला होता. त्यावेळी घाबरलेले मनमोहन म्हणाले हे तू काय करतो आहे, अशाने मी मरू शकतो.

तेव्हा शशी कपूर म्हणाले की, मीसुद्धा तुला किती वेळ हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हा एकच सीन नाही तर अनेकवेळा देसाई यांनी त्यांना अनेक धोकादायक स्टंट्स करायला लावले आहेत. एकदा तर शशी कपूर यांच्या स्टंट डबलच्या डोक्याला ६० टाके पडले होते. त्यानंतर शशी कपूर देसाई यांना चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.