शार्दूल ठाकूरने टीमसाठी ७०० किलोमीटरचा प्रवास केला कारने, कारण ऐकून तुम्ही ठोकाल सलाम

0

 

कोरोनाच्या संकटात खेळाडूंना आपल्या टिमसाठी काय-काय करावे लागत आहे, आता असेच एक ताजे उदाहरण समोर आले आहे. भारतील संघातील गोलंदाज शार्दूल ठाकूरने आपल्या टीमसोबत खेळण्यासाठी ७०० किलोमीटरचा कारने प्रवास केला आहे.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये शार्दूल ठाकूर मुंबईकडून खेळणार आहे. त्याच्या टीमकडून खेळण्यासाठी शार्दूल ठाकूर ७०० किलोमीटर कारने प्रवास करुन अहमदाबाद ते जयपुर प्रवास केला आहे. त्याने केलेल्या या कामामुळे त्याच्या चाहत्यांची त्याने मन जिंकली आहे.

त्याने हा प्रवास यासाठी केला आहे कारण कोरोनापासून स्वता:चा बचाव करत टीमसाठी त्याला खेळता यावे. येत्या २७ फेब्रुवारीला मुंबईला विरुद्ध राजस्थान असा सामना होणार आहे.

शार्दूल ठाकूरची इच्छा असती तर तो विमानाने जाऊ शकत होता, पण त्याने तसे केले नाही कारण जर तो विनानाने गेला असता तर त्याला क्वारंटाईन व्हावे लागले असते. त्यामुळे कारने १० तासांचा प्रवास करुन तो आपल्या टीममध्ये खेळण्यासाठी जयपुरला पोहचला आहे.

जर शार्दूल विमानाने जयपुरला गेला असता, तर त्याला नियंमानुसार तीन दिवस क्वारंटाईन केले गेले असते, असे मुंबई क्रिकेट एसोसिएशनचे सचिव संजय नाईक यांनी म्हटले आहे.

शार्दूल ठाकूरने असे पहिल्यांदा केलेल नाही, त्याने या आधीही एकदा प्रवास केला होता. २०१८ मध्ये जेव्हा शार्दूल दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावरुन भारतात परतला होता, तेव्हा पालघरला जाण्यासाठी त्याने अंधेरी स्टेशनवरुन मुंबईची लोकल धरली होती.

त्यावेळी त्या लोकल ट्रेनमध्ये असलेल्या काही मुलांनी त्याला ओळखले होते, तसेच त्या मुलांनी त्याला सेल्फीची विनंती केली होती. अनेकांना तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला होता की भारतीय संघाचा खेळाडू चक्क लोकलने प्रवास करत आहे.

शार्दुल ठाकूरचे राहणीमान आधीपासूनच साधे होते. त्याचे लोकलसोबत आधीपासूनच नाते आहे. तो पालघरमध्ये राहतो, सुरुवातीला जेव्हा त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती, तेव्हा तो पालघरमधून बोरीवलीला क्रिकेट खेळायला जायचा.

Leave A Reply

Your email address will not be published.