“शरद पवारांच्या ‘या’ दोन चुकांमुळे त्यांचे पंतप्रधान पद हुकले होते”

0

 

भारतीय राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. यशवंतराव चव्हानांचा राजकिय वारसा सांगणारे शरद पवार गेली सात दशकं राजकारणात सक्रिय आहे.

शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४०ला पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात झाला होता. शरद पवार हे शेतकरी कुटुंबातुन होते. त्यांच्या आई शारदाबाई पवार स्वातंत्र्य पूर्व काळात पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात कार्यरत होत्या.

पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी जनरल सेक्रेटरी म्हणून महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर नेतृत्व केले होते. त्याच वेळी त्यांचा युवक काँग्रेसशी संबंध आला.

वयाच्या ३८ व्या वर्षी शरद पवार मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी शरद पवार सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. शरद पवार एकदा दोनदा नाही तर चार वेळा मुख्यमंत्री झाले आहे.

पंतप्रधानपदाचा दावेदार म्हटल्या जाणाऱ्या शरद पवारांना पंतप्रधान का बनता आले नाही, असा प्रश्न अनेकांना पडत असतो. आज जाणून घेऊया या प्रश्नाच्या उत्तराबद्दल काँग्रेसचे नेते पतंगराव कदम काय म्हणाले होते.

२०१७ ला शरद पवार यांच्या राजकिय कारकिर्दीला ५० वर्षे आणि शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीस ५५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या गौरवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यावेळी कदम यांनी शरद पवारांच्या कार्यांचा गौरव करत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता, तेव्हा शरद पवार पंतप्रधान का बनू शकले नाही त्याबद्दल पण ते बोलले होते.

शरद पवार काँग्रेसमधील वजनदार आणि प्रभावी नेते होते. मात्र शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत दोन चुका केल्यात. पहिली ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि दुसरी १९९२-९३ मध्ये देशाचे संरक्षणमंत्री असताना ते संरक्षण मंत्रीपद सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन राज्याच्या राजकारणात परत आले, असे पतंगराव कदम यांनी म्हटले होते.

यशवंतराव चव्हाण यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता होती आणि नंतर शरद पवार हे पंतप्रधान पदासाठी सक्षम नेतृत्व होते. पवारसाहेबांच्या या दोन चुकांमुळेच त्यांना पंतप्रधान होता आले नाही, असे पतंगराव कदमांनी म्हटले होते.

२०१९च्या विधानसभा सभा निवडणूकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. अशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जर महाविकास सरकारने एकत्र निवडणूक लढवली तर शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, असे त्यांचे नातू रोहित पवारांनी म्हटले होते.

तसेच काँग्रेस पक्षात पण भावी पंतप्रधान तयार होऊ लागल्यामुळे शरद पवारांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण होणार का? याबाबत अजूनही चर्चा आहे. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष पुन्हा एकदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.