जेव्हा शरद पवारांनी पराभूत करण्याचा खूप प्रयत्न केला होता तरी आला होता ‘हा’ नेता निवडून

0

 

सोमवारी (८ जानेवारी) काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांच्यासह चार खासदार राज्यसभेतून निवृत्त झाले आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबतच अनेक नेत्यांनी व्यक्तिगत मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

राज्यसभेत यावेळी काही नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबतचे काही किस्सेही सांगितले. यावेळी शरद पवारांनीही एक किस्सा सांगितला आहे, जेव्हा शरद पवार आझाद यांना पराभूत करण्यात अपयशी ठरले होते.

शरद पवारांनी राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांच्या कार्याचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी गुलाब नबी आझाद यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला होता. तो किस्सा शरद पवारांनी ऐकावला आहे.

शरद पवार म्हणाले, १९८२ मध्ये झालेल्या निवडणूकीचा हा किस्सा आहे. गुलाम नबी आझाद हे मुळचे जम्मु-काश्मीरमधून येतात. पण ते आझाद महाराष्ट्रातील वाशिम भागातून निवडणूकीला उभी राहिले होते.

वाशिम हा दुर्गम आणि मागासलेला भाग होता. त्यामुळे त्या भागात निवडणूक लढण्यासाठी कोणीच तयार होत नव्हते. त्यावेळी आझाद यांनी ती हिम्मत दाखवली आणि निवडणूकीला उभे राहिले.

त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो. आम्ही असे ठरवले होते की आझाद यांना निवडून द्यायचे नाही. त्यांना पाडायचे. त्यासाठी आम्ही खुप प्रयत्न केले. आझाद यांच्याविरोधात आम्ही प्रचार सुरु केले. पण तरीही आझाद निवडून आले. त्यांना प्रचंड मतांनी विजय मिळवला होता.

त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी कधीही मागे वळून नाही पाहिले. त्यानंतरच वाशिमकरांचे आणि गुलाम नबी आझाद यांचे नाते अतुट झाले होते. असा किस्सा शरद पवारांनी सांगितला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.