अशा प्रकारे शरद पवारांनी थांबवलं होतं अजित पवारांचे बंड; एकदा वाचाच….

0

गेल्यावर्षी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

गेल्यावर्षी २३ नोव्हेंबरला हा शपथविधी झाला होता. हे सरकार जेमतेम ८० तास टिकले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय खेळीने अजित पवारांचे हे बंड थांबवण्यात आले होते, तर आज जाणून घेऊया अजित पवारांचे हे बंड शरद पवारांनी कसे थांबवले होते.

ज्यावेळी २३ नोव्हेंबरला पहाटे शरद पवारांना हे कळले की अजित पवारांनी सरकार स्थापन केले असून ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे, तेव्हा ती शपथ थांबवणे शरद पवारांना शक्य नव्हते, त्यामुळे त्यांनी हे सरकार कसे बरखास्त करता येईल आणि अजित पवारांना पुन्हा कसे राष्ट्रवादीत आणता येईल याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

अजित पवारांचे हे बंड रोखण्यासाठी शरद पवारांनी तीन पातळ्यांवर रणनीती आखली होती. पहिली रणनीती अशी होती की, अजित पवारांसोबत गेलेले आमदार पुन्हा पक्षात आणायचे. दुसरी रणनीती कायदेशीर रित्या हे सरकार बरखास्त करायचे आणि तिसरी रणनीती होती ती म्हणजे अजित पवार एक कुटुंबातील सदस्य आहे त्यामुळे तिथे त्यांना भावनिक करून त्यांना पुन्हा पक्षात येण्याचे आव्हान करणे.

पहिल्या रणनीतीपासून शरद पवारांनी सुरुवात केली. तेव्हा शरद पवारांनी सगळ्यात आधी आमदारांची यादी बनवली. कुठले आमदार अजित पवारांसोबत गेलेले आहेत आणि उरलेले आमदार किती आहेत. त्या आमदारांना तातडीने संपर्क करण्यात आला.

अजित पवारांसोबत असलेले आमदार राजेंद्र शिंगळे आणि संदीप क्षीरसागर असतील यांनी शरद पवारांच्या बैठकीत कबुली दिली की या बंडाबद्दल आम्हाला काहीही माहीत नव्हते. पुढे शरद पवारांनी स्वतः सूत्र हातात घेत, अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांशी संपर्क साधला.

त्याच दिवशी दुपारी अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ यांना अजित पवारांकडे पाठवण्यात आले. तसेच अजित पवारांना असा निरोप देण्यात आला होता की पक्षात परत या. मात्र अजित पवारांनी पक्षात पुन्हा येण्याचे नाकारले, पण तोपर्यंत अजित पवारांच्या सोबतचे आमदार पुन्हा पक्षात आले होते.

दुसरी जी रणनीती होती ती होती कायद्याची. अजित पवारांनी विधिमंडळ पक्षनेते म्हणून आधीच निवड झालेली होती. त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांच्या सह्यांचे पत्र होते, अजित पवारांनी तेच पत्र समर्थकांचे पत्र म्हणून राज्यपालांना दिलेले होते. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या अजून पण ते विधिमंडळाचे सदस्य होते. त्यामुळे त्यावेळी त्यांची निवड रद्द करणे खूप गरजेचे होते.

तेव्हा अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदावरून हटवण्यात आले आणि त्यावेळी त्यापदी जयंत पाटलांची निवड करण्यात आली. तसेच दुसरीकडे या सरकारबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन ही कायदेशीर लढाई शरद पवारांनी सुरू केली. तिसरी गोष्ट हे बंड शरद पवारांच्या कुटुंबातले होते, त्यामुळे हे बंड लवकरात लवकर शमवणे शरद पवारांना गरजेचे होते.

पवार परिवार नेहमीच राजकारणापलीकडे पण दिसून आला आहे. दिवाळी, भाऊबीज, रक्षाबंधन यासर्व सणांना पवार फॅमिली एकत्र दिसून येत असते. अशात कुटुंबातील काही सदस्य जे राजकारणात नव्हते, त्याच्याकडून अजित पवारांना समजवण्याचे प्रयत्न सुरू झाले.

राजकारण एका बाजूला आणि परिवार एका बाजूला, असे म्हणत अजित पवारांच्या बंडाला थांबवण्याचे काम सुरू होते. या बंडाचा परिणाम पवार कुटुंबावर होता कामा नये, यासाठी पवार कुटुंबातील काही सदस्यांनी यात मध्यस्थी केली होती.

यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका होती शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची. अजित पवार लहानपणापासून प्रतिभा पवार यांच्या खूप जवळ राहिलेले आहे. तेव्हा प्रतिभा पवार यांनी अजित पवारांशी संवाद साधला होता, हा संवाद राजकारणाच्या पलीकडे असून एका कुटुंबातील संवाद होता.

तेव्हा प्रतिभा पवार यांचे म्हणणे अजित पवारांनी मान्य केले होते. तेव्हा अजित पवारांनी आपले बंड मागे घेण्याचा निर्णय घेतला. अशात सुप्रीम कोर्टाचा पण निकाल महाविकास आघाडीकडून लागला होता.

तेव्हा अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ते सिल्व्हर ओकला परतले अशा प्रकारे एक घर वापसी अजित पवारांची झाली होती. अजित पवारांना पुन्हा पक्षात आणण्यात शरद पवारांना अशा प्रकारे यश आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.