शकुंतला ए भगत: भारताच्या पहिल्या महिला इंजीनिअर ज्यांनी डिझाईन केलेत २०० पेक्षा जास्त पुल

0

आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत ज्यांचे भारताच्या विकासात खुप मोठे योगदान आहे. तुम्ही त्यांचे नाव कधी ऐकले नसेल पण त्यांचे या देशासाठी खुप मोठे योगदान आहे.

त्यांचे नाव आहे शकुंतला भगत. त्यांनी जे काम केले आहे ते काही मोजक्या लोकांनाच माहित असेल. शकुंतला भगत भारताच्या पहिल्या महिला सिविल इंजीनिअर होत्या. त्यांनी २०० पेक्षा जास्त पुलांचे डिझाईन्स तयार केले आहेत.

हे पुल भारताच्या कश्मीरपासून ते अरूणाचल प्रदेशपर्यंत पसरलेले आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल त्यांनी डिझाईन केलेले काही पुल अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीमध्येसुद्धा आहेत. शकुंतला ए भगत यांना मॉडर्न इंजीनिअरिंगच्या महारथी बोलले जाते.

त्यांनी क्वाड्रीकॉन या कंपनीची स्थापना मुंबईत केली होती. त्याच फर्मच्या अंतर्गत त्यांनी २०० पुलांचे डिझाईन तयार केले होते. १९५३ साली त्यांनी वीरमाता जीजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्युटमधून सिविल इंजीनिअरिंगची डिग्री मिळवली होती.

त्या पहिला महिला होत्या ज्यांनी सिविल इंजीनिअरिंगची डिग्री मिळवली होती. त्यांचे वडिलही ब्रिज इंजीनिअर होते. शकुंतला भगत यांना पुलांवर रिसर्च करणे आणि त्यांना डेव्हलप करण्यामध्ये मास्टर मानले जाते.

त्यांचे पती अनिरूद्ध एस भगत यांच्यासोबत मिळून त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. शकुंतला भगत यांचे पती हे मॅकेनिकल इंजीनिअर होते. दोघांनी वेगवेगळ्या पुलांच्या डिझाईन्स तयार केल्या होत्या.

त्यांनी सगळ्या अभ्यास करून, ट्रिफीकचा अदांज घेऊन तसेच पुल किती भार उचलू शकतो असा सगळा अभ्यास करून पुलाचे डिझाईन्स तयार केले होते. क्वाड्रिकॉनचे स्टील ब्रिज हिमालयाच्या भागात खुप लोकप्रिय आहेत. कारण हे ब्रिज अशा ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी ब्रिज बांधणे जवळपास अशक्य आहे.

१९७० मध्ये शकुंतला यांनी आपल्या पतीसोबत मिळून क्वाड्रिकॉनची सुरूवात केली होती. सिविल इंजीनिअरिंगच्या क्षेत्रात जे बदलाव झाले त्याचे सगळे श्रेय शकुंतला ए भगत यांना जाते. शकुंतला भगत यांनी अमेरिका, जर्मनी आणि युनाईटेड किंगडम येथीलही अनेक पुलांचे प्रोजेक्ट्स पुर्ण केले होते.

त्यांनी सिमेंटवर रिसर्चदेखील केली होती. त्यानंतर त्या कॉक्रिट असोसिएशन ऑफ लंडन येथे त्या गेल्या होत्या आणि इंडियन रोड कॉग्रेसच्या सदस्या बनल्या होत्या. १९७२ मध्ये हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पीति येथे पहिला पुल उभारण्यात आला होता.

या ठिकाणी २ छोटे पुल उभारण्यात आले होते आणि विशेष म्हणजे या पुलांचे काम ४ महिन्यांच्या आतच पुर्ण झाले होते. त्यानंतर शकुंतला यांची क्वाड्रिकॉन ही कंपनी खुप प्रसिद्ध झाली. १९७८ पर्यंत त्यांनी ६९ पुल उभारले होते. १९९३ मध्ये त्यांना वुमन ऑफ द इअरचा अवॉर्डदेखील मिळाला होता. वर्ष २०१२ मध्ये ७९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.