भारतीय वैज्ञानिकाचा पुन्हा नासात डंका, एका रुममधून गुप्ता सांभाळताय नासाचे मिशन

0

 

 

अमेरिकेची अंतरिक्ष एजन्सी नासाने नुकतेच मंगळावर आपल्या रोबोट पर्सेवरेंस रोवरला यशस्वीरित्या उतरवले आहे. हा रोबोट जीवन मंगळावर जीवन जगता येणार की नाही याचे संशोधन करणार आहे.

या कामात अनेक वैज्ञानिक दिवस-रात्र मेहनत घेताना दिसून येत आहे, विशेष म्हणजे  या कामात भारतीय वैज्ञानिक प्राध्यापक संजीव गुप्ताही यात महत्वाची भुमिका बजावत आहे.

संजीव गुप्ता नासाच्या या विशेष मिशनात सहभागी आहे. विशेष म्हणजे ते या रोबोटला नासाच्या हेडक्वार्टर मधून नाही तर घरी बसून कंट्रोल करत आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल दक्षिण लंडनमध्ये त्यांनी एक बन बेडरुमचा फ्लॅट घेतला आहे. त्यातून ते सर्व सांभाळत आहे.

५५ वर्षांचे संजीव गुप्ता मुळ भारतीय असणारे ब्रिटीश वैज्ञानिक आहे. ते लंडन इंम्पेरियल कॉलेजमध्ये भुविज्ञानाचे विशेषज्ञ सुद्धा आहे. सध्या ते नासाच्या या मंगळावर होणाऱ्या अभियानाशी जुळलेले आहे.

संजीव गुप्ता आता त्या रोबोटसाठी आणखी टास्क तयार करणार आहे. त्यांना कॅलिफोर्नियामधल्या नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबमध्ये काम करायचे होते, पण लॉकडाऊनमुळे हे शक्य नाही.

प्रोफेसर गुप्ता यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी संबंधित असलेले कॉलेज सेंट कॉर्स कॉलेजमधून पीएचडीचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी कुटुंबाला आपल्या कामाची अडचण होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या घराजवळच एक फ्लॅट घेतला आहे, तिथूनच ते काम करत आहे.

या मोहिमेत नासाच्या ४०० पेक्षा जास्त वैज्ञानिकांचा समावेश आहे, पण सध्या सगळीकडेच कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीवर बंदी असल्याने बरेच वैज्ञानिक घरुनच काम करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.