या अभिनेत्रीवर ममता बॅनर्जींनी इतका विश्वास का दाखवला? वाचा कोण आहे ती अभिनेत्री..

0

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक २०२१ लवकरच पार पडणार आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपले उमेद्वार घोषित केले आहेत. त्यामध्ये कलाकार आणि क्रिकेट जगतातील अनेक मोठ्या लोकांचा समावेश आहे.

याच लिस्टमध्ये समावेश आहे अभिनेत्री सायोनी घोषचा. २४ जानेवारीला सायोनी ही तृणमुल कॉग्रेसमध्ये सामिल झाली होती. सायोनी आसनसोल दक्षिणमधून विधानसभा चुनाव लढणार आहे. सायोनी घोष राजकारणात येण्याच्या आधी अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

बीजेपी नेता आणि मेघालयचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी सायोनीवर आरोप लावला होता की तिने धार्मिक तेढ निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांनी तिच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती.

जानेवारी २०२१ रोजी सायोनी घोषने श्रीरामांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर तिचे आणि तथागत रॉय यांचे ट्वीटर वॉर सुरू झाले होते. त्यानंतर तथागत रॉय यांनी तिच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती.

२०१५ मध्ये तिने एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये एक महिला शिवलिंगाला कंडोम घालताना दिसत आहे. असे म्हणतात की हा फोटो एड्सच्या विरोधात जागरूकता करण्यासाठी होता. त्यावर बोलताना सायोनी म्हणाली होती की, त्यावेळी तिचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाले होते.

तो फोटो तिने पोस्ट केला नव्हता. तिने ते ट्वीट डिलीट करून टाकले होते पण तथागत यांनी या ट्वीटवरून तिला घेरले होते आणि एफआयआर दाखल केली होती. याच जुन्या ट्वीटवरून तिच्यावर वारंवार टीका होत आहे.

सौमित्र खान यांनी एका जनसभेत या ट्वीटवरून निशाना साधताना अपशब्दही वापरले होते. बंगाली अभिनेत्री सायोनी घोष आधीपासूनच डान्सर म्हणून प्रसिद्ध होती पण तिला कधी वाटले नव्हते की पुढे जाऊन ती बंगालीमधील मोठी अभिनेत्री बनेल.

सायोनी स्टोर्ट्समध्ये चांगली होती. तिने इंटर लेवल पर्यंत टेबल टेनिस खेळले आहे आणि ती टेबल टेनिसची चॅम्पियन राहून गेली आहे. सायोनी घोषला डान्स करण्याचाही आधीपासूनच छंद होता.

तिने भरतनाट्यम शिक्षण घेतले आहे आणि इलाहाबादच्या घराण्यातून गाण्याची ट्रेनिंगही घेतले आहे. तिने जादवपुर युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिश मे ग्रेज्युएशन केले आहे. तेव्हा तिला अभिनयाची ऑफर आली आणि तेव्हा ती अभिनयाच्या दुनियेत एन्ट्री आली.

अभिनयात तिने खुप नाव कमावले. आणि आता तिला तृणमुल कॉग्रेसने विधानसभेचे तिकीट दिले आहे. सध्या तिचा प्रचाराचा एक व्हिडीओ खुप व्हायरल होत आहे आणि बंगाली लोकांकडून तिला खुप प्रेम मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.