पुण्यतिथी विशेष: सावित्रीबाई फुले यांच्या या १० रंजक गोष्टी माहितीये का?

0

 

देशातील पहिल्या महिला शिक्षिका अशी ओळख असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी. सावित्रीबाई यांनी त्यांचे पुर्ण आयुष्य महिलांच्या आणि मुलींच्या अधिकारांसाठी समर्पित केले होते.

सावित्रीबाई यांनी निर्भिडपणे महिलांचे प्रश्न मांडले. भारतातील स्त्रीमुक्तीचं प्रतिक असलेल्या सावित्रीबाई फुले महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या चळवळीत मोठे योगदान आहे.

सावित्रीबाई फुले यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळूनच त्यांनी देशातील पहिल्या मुलींच्या शाळेची स्थापना केली होती. चला तर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या काही १० रंजक गोष्टी जाणून घेऊया…

१. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये साताऱ्याच्या नायगाव जिल्ह्यात झाला होता. त्या एक शेतकरी कुटुंबातल्या होत्या.

२. सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या दहाव्याच वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी झाला होता, तेव्हा ज्योतिराव फुले यांचे वय १३ वर्षाचे होते.

३. सावित्रीबाई फुले यांचे समाज सुधारणा चळवळीत मोठे योगदान होते. तेव्हा समाजाकडून खुप विरोध होत असतानाही त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मदतीने देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली होती. त्यानंतरही त्यांनी जवळपास १८ शाळा उघडल्या होत्या.

४. त्यांनी पहिली शाळा १८४८ मध्ये सुरु केली होती, तेव्हा त्यांच्या शाळेत फक्त ९ विद्यार्थिनी होत्या. तेव्हा मुलींनी शाळा सोडून जाऊ नये यासाठी त्या त्यांना शिकवण्यासोबतच काही पैसेही द्यायच्या.

५. त्यावेळा भारतीय समाजात विधवा महिलांचे केशवपन केले जायचे. त्याविरोधात आवाज उचलणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

६. मुलींच्या शिक्षणासोबतच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधातही त्यांनी त्यांचा आवाज उठवला होता. तसेच सावित्रीबाई यांनी बलात्कारीत गर्भवती महिलांसाठी एक केंद्र सुरु केले होते. तिथे गर्भवती महिलांना बाळाला जन्म देण्यासाठी त्या खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभ्या राहायच्या.

७. समाजातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी सावित्रीबाई फुले यांनी स्वता:च्या घरातील विहिर सुरु केली होती.

८. ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळून सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आतंरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळण्यासाठी हा त्यामागचा हेतू होता.

९. १८९७ मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरलेली होती. तेव्हा सावित्रीबाई यांनी दत्तक घेतलेला मुलगा यशवंत यांच्यासोबत लोकांवर उपचार करण्यासाठी एक केंद्र उभारले होते. रुग्णांची सेवा करत असतानाच सावित्रीबाई यांनाही प्लेगचा आजार झाला होता, त्या आजारामुळेच त्यांची १० मार्च १८९७ मध्ये प्राणज्योत मावळली होती.

१०. १९९८ मध्ये भारतीय टपाल खात्याने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ एक तिकिट प्रकाशित केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.