आई ती आईच! मुलांचे पोटभरण्यासाठी रोज ३० फुट उंचीच्या ३० झाडांवर चढून करते काम

0

 

असे म्हणतात एका आईसारखे प्रेम मुलावर कोणीच करु शकत नाही. आई आपल्या मुलांना कधीच उपाशी बघू शकत नाही. त्यामुळे नेहमीच मुलांना चांगले खायला मिळावे, यासाठी प्रत्येक आई धडपड करताना दिसत असते.

आजची गोष्ट अशाच एका आईची आहे, जी आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी तब्बल ३० फुट उंचीच्या ३० झाडांवर चढत आहे. तेलंगणात राहणाऱ्या या महिलेचे नाव सावित्री  असे आहे.

तेलंगणाच्या रेगोडे गावात सावित्री राहते. पैसे कमवण्यासाठी काही साधन नसल्याने ती ताडच्या झाडावर चढून ताडी काढून त विकत आहे. त्यातून मिळालेल्या पैशातूनच ती आपल्या मुलांचे पोट भरत आहे.

तिच्या पतीचा आता मृत्यू झालेला आहे. २०१६ मध्ये तिचा पती तिला सोडून निघून गेला होता, तेव्हा ती गर्भवती होती. त्यानंतर तिला एक मुलगी झाली. सावित्रीचे १० वीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांना नोकरी मिळाली असती पण त्यांना आपल्या पतीचाच व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता.

माझ्या मुलीला शिक्षणाची गरज आहे, बऱ्याचवेळा ती आजारी पडते, त्यामुळे तिला औषधोपचारसाठी पैशांची गरज पडते, त्यामुळे मी ताडी विकण्याचे काम करत आहे.

सुरुवातीला त्यांना या कामासाठी लायसेन्स मिळत नव्हते. पण अखेर तिला या कमसाठी लायसेन्स मिळालेच. सावित्री रोज ३० झाडांवर चढून ताडी काढतात. या कामासाठी त्या दररोज १० किलोमीटर पायपीट करतात.

आपल्या मुलांसाठी संघर्ष करत असलेल्या या आईचे सगळीकडेच कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे ती से काम निवडले आहे जे खूप जोखिमेने भरलेले आहे. पण म्हणतात ना आई ती आईच.

Leave A Reply

Your email address will not be published.