कुठलाही विचार न करता थेट आमदाराच्या कानाखाली लावणाऱ्या या वाघिणीबद्दल माहितीये का?

0

 

 

माणसात जर आपले ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर त्याच्या समोर कितीही संकट आली तरी त्यांचा सामना तो करु शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेची गोष्ट सांगणार आहोत, जिने आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना केला आहे आणि त्या संकटांवर मात करुन स्वता:ला सिद्ध करुन दाखवले आहे.

या महिलेचे नाव सौम्या सांबशिवन असे आहे. सौम्या एक महिला पोलिस अधिकारी आहे. जेव्हा जेव्हा दबंग पोलिस अधिकाऱ्यांची चर्चा सुरु होते तेव्हा सौम्या यांचे नाव चर्चेत येतेच.

सौम्या एक आयपीएस ऑफिसर आहे. सौम्या मूळ केरळच्या आहेत. २०१० मध्ये हिमाचल प्रदेशच्या कॅडर बॅचच्या त्या आयपीएस अधिकारी आहे. सौम्या यांनी दाखवलेल्या धाडसाचे अनेक किस्से प्रसिद्ध झाले आहे.

सौम्या यांनी बायो स्ट्रीटमधून पदवी घेतली होती, त्यानंतर त्यांनी एमबीए पुर्ण केले. पुढे त्यांनी बँकेत नोकरी सुरु केली, ती जवळपास दोन वर्षे त्यांनी केली. नोकरी करत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारीही सुरु केली होती.

२०१० मध्ये आयपीएस झाल्यानंतर त्यांची एसपी म्हणून पहिली पोस्टींग हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात झाली. त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी सुरु होती. पण सौम्या यांनी कारवाई केली आणि त्या सर्व गुन्हेगारांना चांगलाच धडा शिकवला.

एकदा सिरमौरमध्येच एसपी म्हणून कार्यरत असताना त्यांना एका आमदाराच्या कानाखाली लावली होती. इतकेच नाही तर त्या आमदाराला सौम्या यांनी तुरुंगातही डांबले होते. या प्रकरणामुळे सौम्या देशभरात चर्चेचा विषय बनल्या होत्या.

२०१७ मध्ये सौम्या यांचे शिमल्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. तेव्हा त्या शिमलाच्या पहिल्या महिला एसपी झाल्या होत्या. तिथेही त्यांनी गुन्हेगारांना चांगला धडा शिकवत गुन्हेगारीवर आळा घातला होता. तसेच त्यांनी गुन्हेगारी रोखण्यासोबतच मुलींना सुरक्षित राहण्यासाठी एक खास प्रकारचे ट्रेनिंग दिले आहे.

सौम्या यांनी मध्य प्रदेशमधल्या मुलींना स्प्रे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. हा स्प्रे कोणाच्याही डोळ्यात मारला तर तो समोरचा व्यक्ती अर्धा तास डोळे उघडू शकत नाही, मुली या स्प्रेचा उपयोग स्वता:च्या सुरक्षिततेसाठी करु शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.