जिद्दीला सलाम! शेतीत मजुरी करणाऱ्या आईचे स्वप्न केले पूर्ण; बहीण-भावाने केली स्पर्धा परीक्षा

0

 

अनेकदा आपण ध्येय कसे गाठता येईल याचा विचार करणयापेक्षा आपली परिस्थिती चांगली नाही, याचे कारण देत बसत असतात. अशात जर तुम्ही ध्येय गाठणयासाठी प्रयत्न केले, तर परिस्थिती कशीही असो, तुम्ही तुमचे ध्येय एक दिवस नक्की गाठता येईल. असेच एक उदाहरण आता समोर आले आहे.

आपल्या कौटुंबिक परिस्थितीवर मात करत बहिण-भावाने स्पर्धा परिक्षेत यश मिळवले आहे. गोळेगाव तालुका जुन्नर येथील राहणाऱ्या या तरुणाचे नाव सतिश बेळे आहे, तर त्याच्या बहिणीचे नाव छाया बेळे असे आहे. सतिशची निवड आसाम रायफल्समध्ये झाली आहे, तर छायाची सीआरपीएफमध्ये निवड झाली आहे.

सतीशचे शिक्षण बारावी पास असे झाले आहे, तर त्याची बहिण छाया बी.कॉम झालेली आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केल्याने सगळीकडून या बहिण-भावांचे कौतुक केले जात आहे.

त्यांच्या एकत्र कुटूंबातील शेती फक्त अर्धा एकर आहे. त्यांचे वडिल म्हणजेच विठ्ठल बेळे हमालीकाम करतात, तर आई शेतीत मजूरी करते. विठ्ठल हे कुटूंब चालवण्यासाठी तीनचाकी सायकल चालवून व्याराऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहचवतात.

आपले आई-वडिल आपल्या इतके कष्ट घेत आहे, याची जाणीव बहिण-भावांना होती. त्यामुळे त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या स्पर्धा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यात यश मिळवले आहे.

आसाफ रायफल्स आणि सीआरपीएफच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत असणाऱ्या परिक्षा बहिण-भावांनी २०१६ पासून देण्यास सुरुवात केली. २०१८ मध्ये परिक्षांचा निकाल जाहीर झाला आणि सतीश व छाया हे दोघेही भाऊ-बहिण परिक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले.

आपल्या परिस्थितीला समोर न ठेवता सतीश व छाया यांनी नेहमीच आपल्या ध्येयाला समोर ठेवले आणि आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर हे यशाचे शिखर गाठले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.