सरपंच असावी तर अशी! गावात मुलगी जन्मली तर तिच्या आईला देतेय स्वतःचा दोन महिन्याचा पगार

0

 

 

समाजात काही असे लोकही असतात, जे स्वता:च्या कुटुंबासोबत समाजाचा पण विचार करत असतात, आजची गोष्ट पण अशाच एका महिलेची आहे, जिने फक्त एका समाजाचाच विचार केला नाही, तर तिने पुर्ण गावाचाच विकास केला आहे.

मध्य प्रदेश राहणाऱ्या या महिला सरपंचचे नाव भक्ती शर्मा असे आहे. भक्ती शर्मा यांनी गावाचा विकास करण्यासाठी अमेरिकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्या गावाच्या सरपंच झाल्या आहे.

भक्ती शर्मा भोपाळपासून २० किलोमीटर असणाऱ्या बरखेडी अब्दुल्ला गावच्या सरपंच आहे. एकेकाळी या गावात विजेची कमतरता होती, लोकांना राहण्यासाठी चांगली घरे नव्हती, अशुद्ध पाण्याची अडचण होती, पण आता बऱ्यापैकी या अडचणींना भक्ती शर्मा यांनी सोडवले आहे.

आता भक्ती शर्मा यांनी पिण्याच्या शुद्ध पाण्यासोबतच गावातल्या वीज आणि शौचालयाचीही व्यवस्था केली आहे. त्यामुळे भक्ती शर्मा या आता भारताच्या सगळ्यात प्रभावशाली महिलांमध्येही सामील झाल्या आहे.

भक्ती यांनी भोपाळच्या नुतन कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स केले आहे, तसेच त्यांनी वकिलीसुद्धा केली आहे. त्यानंतर त्या अमेरिकेत नोकरी करण्यासाठी गेल्या. पण त्यांना तिथे राहून आपल्या गावाची जाणीव झाली आणि गावाचा विकास करण्यासाठी त्या पुन्हा गावात परतल्या.

२०१५-१६ च्या सरपंचपदाच्या निवडणूका होत्या, तेव्हा आपल्या कुटुंबाच्या आणि गावातल्या लोकांच्या बोलण्यावरुन त्या निवडणूकीत उभ्या राहिल्या, त्या निवडणूकी त्या निवडून आल्या.

काही वर्षातच त्यांनी गावाचे स्वरुपच बदलून टाकले. भक्ती शर्मा यांनी गावातल्या महिला आणि मुलींसाठी मोहिम देखील सुरु केली आहे. गावात कोणत्याही महिलेला जर मुलगी झाली तर त्या महिलेला भक्ती त्यांचा दोन महिन्याचा पगार देतात. तसेच मुली जन्माच्या आनंदात गावात १० झाडे लावतात.

सरपंचपद मिळाल्यानंतर त्यांनी ८० टक्क्या झोपड्यांना चांगल्या घरामध्ये बदलेले आहे. तसेच काही वर्षांपुर्वी या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करावी लागयाची पण आता त्यांनी गावात वीज, पाणी आणि शौचलयाची सुविधा केली आहे.

एकेकाळीया गावात खुप अशिक्षित होती, पण आता भक्ती यांनी गावातल्या लोकांना शिक्षणाचे महत्व समजावले आहे. तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांना शाळेत जाण्यासाठी सायकल तर दिल्याच आहे, तसेच गावातून शाळेत जाणाऱ्या रस्त्यांची सुधारणा केली आहे.

तसेच गावातील मुलं कुपोषण मुक्त असावी यासाठी त्यांनी शाळेत मीड डे मील सुद्धा सुरु केली आहे. याशिवाय त्यांनी गावात सोईसुविधाही निर्माण केल्या आहे. आज भक्ती शर्मा आणि त्यांचे गावातील काम अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.