उगीच नाही म्हणत जगाचा पोशिंदा, ८१ वर्षांच्या आजीने १ एकर ज्वारीचे क्षेत्र केले पक्ष्यांच्या नावावर

0

 

जगात अशा व्यक्ती खुप कमी आहेत, ज्या आपल्या कुटूंबासोबतच समाजाचा आणि पर्यावरणात असलेल्या पशुपक्ष्यांचाही विचार करतात. याच यादीतले एक नाव म्हणजे इंदापुरच्या ८१ वर्षीय सरस्वती आजी.

सरस्वती आजींचे पक्षीप्रेम पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पक्षांना खाद्य मिळावे आणि त्यांना पाणी पिता यावे यासाठी आजींनी चक्क एक एकर जमीन राखून ठेवली आहे. त्यांच्या या कामाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे.

इंदापुरमध्ये राहणाऱ्या या आजींचे पुर्ण नाव सरस्वती भिमाराव सोनवणे असे आहे. त्यांचे लहानपणापासूनच पक्षांवर अपार प्रेम आहे. त्यामुळे आजींनी एक एकर जमीन पक्षांच्या नावे राखून ठेवली आहे, विशेष म्हणजे आजींची अडीच एकर जमीन असून उरलेली जमीन त्यांनी मुलां-बाळांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

आजींच्या एक एकर शेतीत ज्वारीचे पीक आहे. तसेच पक्षांना पाणी पिता यावे यासाठी त्यांनी पिण्याची पाण्याची सोय केली आहे. त्यासाठी त्यांनी शेतात काही ठिकाणी पाण्याच्या बॉटल ठेवलेल्या आहे.

इंदापुरमध्ये उसाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, तर ज्वारीचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे धान्यावर अवलंबून असलेल्या पक्षांना अडचण निर्माण झालेली आहे.

त्यामुळे आजींनी एक एकराच्या शेतीत ज्वारीचे उत्पादन घेतले आहे. पिकातील जवळपास सर्वच ज्वारी पक्ष्यांनी खाल्लेली दिसते, तसेच त्यांच्यासाठी शेतीत पाणी पिण्यासाठी बॉटलही ठेवल्या आहे.

अनेक ठिकाणी शेतातील ज्वारी बाजरीचे उत्पादन वाढण्यासाठी शेतकरी बाजरी ज्वारी खाणाऱ्या पक्ष्यांना हुसकावून लावत असतात. पण असे असाताना आजींना पक्ष्यांवर दाखवलेले प्रेम हे प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.