..त्यावेळी संजूच्या क्रिकेटसाठी त्याच्या वडीलांना सोडली होती पोलिसाची नोकरी, वाचा संघर्षमयी प्रवास

0

आयपीएलचा नवीन हंगाम सध्या सुरू आहे. यावेळी सगळ्याच संघांमध्ये अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. बऱ्याच नवीन खेळाडूंना यावेळी कर्णधारपद सांभाळण्याची जबाबदारी मिळाली आहे.

यात राजस्थानचा संजू सॅमसन याचाही समावेश आहे. आयपीएलच्या १० व्या हंगामात जेव्हा त्याने ६३ चेंडूमध्ये १०२ धावा केल्या होत्या तेव्हा त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी त्याला कर्णधारपद देण्यात आले आहे.

यावेळीही त्याने पहिल्याच सामन्यात शतक ठोकून सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते पण त्यानंतर राजस्थान संघाला काही खास अशी कामगिरी करता आली नाही. पण संजूचा प्रवास जर तुम्ही वाचला तर त्याला येथपर्यंत पोहोचण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला आहे.

संजूचा जन्म ११ नोव्हेंबर १९९४ मध्ये तिरूवनंतपूरम येथे झाला होता. संजूचे वडील दिल्ली पोलिसमध्ये कॉन्स्टेबल होते. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. दिल्लीमध्येच त्याची सुरूवात झाली होती.

त्याच्या क्रिकेट प्रेमामुळे पुर्ण कुटुंब त्याला त्याला साथ देत होते. प्रचंड मेहनत केल्यानंतर संजूची दिल्लीच्या अंडर १४ च्या संघातही निवड झाली नाही. तेव्हा त्याच्या वडीलांनी दिल्ली पोलिसातील आपल्या पदाचा राजीनामा दिला.

पुर्ण कुटुंब घेऊन ते तिरूवनंतपुरम येथे गेले. आता वडीलांच्या देखरेखेखाली तो क्रिकेट खेळू लागला. संजूचे वडील विश्वनाथ सॅमसन हे पुर्णवेळ मुलाच्या क्रिकेटवर लक्ष ठेऊन होते. त्यांच्या तालमीत संजू क्रिकेट खेळू लागला.

त्यानंतर लवकरच त्याची मेहनत फळाला आली. त्याने वडीलांची अपेक्षा पुर्ण केली. संजूची निवड भारताच्या अंडर १९ संघात झाली. या संघात तो उपकर्णधार होता. पण त्याचा खरा खेळ हा लोकांना आयपीएलमध्येच दिसला.

आयपीएलमध्ये केलेल्या धडाकेबाज खेळीनंतर त्याला भारताच्या टी-२० संघात स्थान मिळाले. भारताकडून आजपर्यंत त्याने ७ टी-२० सामने खेळले आहेत. पण त्याने आयपीएलमध्ये १०२ धावांची खेळी केल्यानंतर त्याला खुप प्रसिद्धी मिळाली.

त्यानंतर त्याने या सीजनमध्येही शतक झळकवले पण तो सामना राजस्थान जिंकू शकली नाही. संजू धडाकेबाज खेळीसाठी आणि मोठमोठे सिक्स मारण्यासाठी ओळखला जातो. गेल्या हंगामात त्याने ३२ चेंडूत ७४ धावा केल्या होत्या होत्या ज्यामध्ये ९ षटकारांचा समावेश होता.

संजूने आपल्या कॉलेजमधील एका मुलीसोबत २०१८ मध्ये लग्न केले आहे. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्याच्या पत्नीचे नाव चारूलता आहे. संजूच्या नावावर अनेक विक्रम आहेत. रणची ट्रॉफीतील सर्वात तरूण कर्णधार म्हणून त्याची ओळख होती.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक झळकवणारा तो एकमेव विकेटकीपर फलंदाज आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.