नांदेडच्या शेतकऱ्याने ‘या’ विदेशी भाजीपाल्याची लागवड करून कमावले लाखो रुपये; वाचा कसे…

0

 

आजकाल शेतात शेतकरी नवनवीन प्रयोग करताना दिसून येतात. आता नांदेडमध्ये शेतकऱ्याने केलेला असाच एक आगळा वेगळा प्रयोग यशस्वी झाला असून या पिकातून त्याला लाखोंची कमाई झाली आहे.

नांदेडमधल्या एका शेतकऱ्याने झुकीनी या विदेशी फळाची यशस्वी लागवड केली आहे. लोहा तालुक्यातील पोराखभोसी येथे राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव संजय ताठे असे आहे. मागील दोन वर्षांपासून ते झुकीनीची शेती करत आहे.

अमेरिकेतील लोकं भाजीसाठी झुकीनीचा मोठ्याप्रमाणात उपयोग करतात. असे असले तरी या भाजीचे मोठ्याप्रमाणात उत्पादन इटली या देशात होते.

झुकीनी हा विदेशी भाजीपाला आपल्या फायद्याचे आहे, हे लक्षात येताच ताठे यांनी आपल्या शेतात या पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली गेली. या शेतीतून संजय ताठे यांना वर्षाला दीड ते दोन लाख निव्वळ नफा मिळतो.

आपल्या देशाच्या वातावरणात देखील झुकीनीचे पीक उत्तमप्रकारे येते. तसेच या भाजीमध्य मोठ्याप्रमाणात प्रोटीन, कॅलरीज आणि खनिज प्रथिने मिळतात, असे संजय ताठे यांनी म्हटले आहे.

झुकीनी या फळाला बाहेर देशात क्यूकरबीटा पेपो किंवा कोर्टगेट या नावांनी ओळखले जाते. ही भाजी अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणूनही जगभर प्रसिद्ध आहे.

झुकीनीमध्ये दोन प्रकार पडतात. एक झुकीनी पिवळ्या रंगाचे असते तर दुसरी पिवळ्या रंगाची. बाजारातली स्थिती पाहून संजय ताठे यांनी झुकीनीचा लागवड केली होती. या पिकामुळे लॉकडाऊन काळात त्यांची चांगली कमाई झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.