देव तारी त्याला कोण मारी! दोन मोठ्या अपघातानंतरही वाचला होता बॉलीवूड ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

0

 

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते अशा वेगवेगळ्या भूमिका निभावणारे संजय खान यांचा आज वाढदिवस. संजय खान हे हृतिक रोशनचे सासरेदेखील आहे.

संजय खान यांनी आपल्या बॉलिवूडच्या कारकिर्दीला सुरुवात १९६४ मध्ये आलेल्या हकीकत या चित्रपटातून केली होती. त्यांनी तीन दशके चित्रपटांमध्ये काम केले. या काळात त्यांनी जवळपास ३० चित्रपट केले.

तसेच चित्रपटांसोबत त्यांनी मालिकांमध्येही काम केले होते. त्यांची ‘द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान’ ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेच्या मुख्यभूमिकेत तेच होते तर या मालिकेचे दिग्दर्शनसुद्धा त्यांनीच केले होते.

याच मालिकेच्या सेटवर ८ फेब्रुवारी १९९० ला एक अपघात झाला होता. या सेटवर अचानक आग लागली होती, तेव्हा या आगीत संजय खान सुद्धा होरपळून निघाले होते, त्यांचे शरीर जवळपास ६५ टक्के भाजले होते.

१३ दिवस जवळपास त्यांच्यावर ७३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली आणि ते पुन्हा आपल्या कामावर रुजू झाले. त्यावेळी डॉक्टरांनी अभिनय सोडण्याचा सल्ला पण डॉक्टरांनी त्यांना दिला होता, पण ते लवकरच बरे झाले होते.

एका मुलाखतीत त्या अपघाताबद्दल सांगताना म्हणाले होते की, इतकी भीषण घटना घडेल याची कल्पना देखील केली नव्हती. मी लेखकासोबत स्टुडिओच्या बाहेर होतो, अशात अचानक स्टुडिओमध्ये आग लागली, आम्ही जेव्हा आत गेलो तेव्हा अचानक माझ्या डोक्यात काहीतरी पडले आणि पुढे काय झालं हे तर सगळ्यांनाच माहीत आहे.

संजय खान यांनी एकदा नाही तर दोनदा मृत्यूला चकमा दिला आहे. २००३ साली त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. ही घटना म्हैसूरमध्ये घडली होती. तेव्हा अनेक फूट उंचीवरून हेलिकॉप्टर खाली होते. तेव्हा पण संजय खान वाचले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.