या शेतकऱ्याचा नादच नाय! उस पट्ट्यात अशा प्रकारे केली पेरूची लागवड, आता कमावतोय लाखो

0

जे शेतकरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात शक्यतो त्यांना यश मिळतेच. त्या शेतकऱ्यांचे नेहमी कौतुक केले जाते. आज अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

या शेतकऱ्याने कोल्हापूर सांगली या उस पट्ट्यात पेरूची यशस्वी शेती केली आहे. त्याने आपला कॉर्पोरेट जॉबही सोडला आणि पेरूची लागवड करत आपले एक वेगळेपण सिद्ध केले आहे. पश्चिम महाराष्ट्राचा हा कोल्हापूर सांगली पट्टा साखरपट्टा म्हणून ओळखला जातो.

पण अशा परिस्थितीत सांगलीच्या ३४ वर्षीय शीतल सुर्यवंशी या पठ्याने पेरूची शेती करत चांगले उत्पन्न मिळवले आहे. आपले शिक्षण पुर्ण केल्यानंतर शीतल एका खाजगी कंपनीत काम करत होता.

पण त्याच्या मनात काहीतरी वेगळेच चालले होते. त्याला उसाची शेती करायची नव्हती. त्याला काहीतरी वेगळे करून पाहायचे होते म्हणून त्याने पेरूची शेती करण्याचे ठरवले. त्याच्या एका मित्राने त्याला पेरूची लागवड करण्याचा सल्ला दिला होता.

सांगली भागात पेरूची लागवड करण्यासाठी उत्तम वातावरण होते. पण त्याचे घरचे ऐकायला तयार नव्हते. कसेतरी त्याने आपल्या वडिलांना समजावले आणि १० एकर जमिनीतील २ एकरामध्ये त्याने पेरूचा प्रयोग केला.

उर्वरित ८ एकरात त्याच्या वडिलांनी उसाची लागवड केली होती. त्याने विविध जातींच्या पेरूची लागवड केली. तसेच सेंद्रिय खतांचा वापर केला. त्याच्या या प्रयोगाला यश आले. त्याने पहिल्यांदाच १० टन पेरुचे उत्पादन काढले.

बाजारात त्याने हा माल विकला आणि त्याची ३ लाखांची कमाई झाली. यात सगळा खर्च जरी वगळला तरी शितलने १४ महिन्यात एक ते दिड लाखांचा नफा कमावला आहे. मुख्य म्हणजे त्याने फक्त दोन एकरात हा कारनामा करून दाखवला आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही सर्व माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.