विराटला ७ वेळा मामा बनवणाऱ्या संदीप शर्मा बद्दल माहितीये का?

0

सध्या आयपीएलचे १३ वे सिजन सुरू आहे. यात आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाने मुंबई इंडियन्स आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचली आहे. मुंबईत खेळणाऱ्या जसप बुमराहची सगळीकडून वाहवाह होत आहे.

मुंबईच्या संघात बुमराहने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. बुमराहच्या कामगिरीमुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. बुमराहची पहिली आणि १०० वी विकेट ही विराट कोहलीची होती. पण तुम्हाला माहितीये का? विराटला आणखी एका बॉलरने ७ वेळा तंबूत पाठवले आहे. तो म्हणजे सनराईझर्स हैदराबादचा बॉलर संदीप शर्मा.

संदीप शर्माची आकडेवारी बुमराहप्रमाणेच आहे, ९० सामान्यांनंतर देखील दोघांच्या आकडेवारी कमालीचे साम्य दिसून येते. तरीही संदीपला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. तसेच भारतीय संघात जागाही नाही.

आयपीएलमध्ये आपले चांगले प्रदर्शन करत जसप्रीत बुमराहने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इतकेच नाही तर जागतिक क्रिकेट स्पर्धेतदेखील खूप कमी वेळात नाव कमावले आहे.

मैदानात तशीच हुकुमत संदीपची पण आहे. फलंदाजांची भंबेरी उडेल असा वेग नाही, फलंदाजाची एकाग्रता भटकवण्यासाठी शिवीगाळ, हावभाव, खाणाखुणा नाही, आणि चौकार आणि षटकार मारल्याने खचूनही जायचे नाही. पण सापळा रचून अचूक टप्प्यावरची स्विंग बॉलिंग करून फलंदाजाला कोंडीत पकडणे ही संदीपची स्टाईल.

संदीप हा मूळचा पंजाबचा आहे. क्रिकेटची सुरुवात त्याने पतियाळा इथल्या शाळेतून केली. संदीप सुरुवातीला बॅट्समन होता, परंतु कोचने त्याला बॉलिंगकडे लक्ष द्यायला लावले. अंडर १९ या २०१०च्या वर्ल्डकपमध्ये संदीप भारतीय संघात होता. संदीपने या सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन केले होते.

२०१२ मध्ये अंडर १९ च्या ऑस्ट्रेलिया आयोजित वर्ल्डकपमध्येही संदीपने दमदार कामगिरी बजवली होती. फायनलमध्ये संदीपने ४ विकेट घेतल्या त्यामुळे भारताला तो सामना जिंकणे शक्य झाले होते.

११ मे २०१३ ला त्याच्या चांगल्या प्रदर्शनामुळे आयपीएलमधल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघात स्थान मिळवले. हैद्राबादविरुद्धच्या पाहिल्याच सामन्यात संदीपने ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच २०१४, २०१५ मध्येही संदिपने चांगले प्रदर्शन केले होते.

२०१५ मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर संदीपची निवड भारतीय संघात करण्यात आली होती. त्यावेळी भारतीय संघाच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. संदीप तिथे चांगले प्रदर्शन करू शकला नाही. त्यानंतर त्याचा कधीही भारतीय संघासाठी विचार करण्यात आलेला नाही.

संदीपची पॉवरप्ले स्पेशालिस्ट म्हणून देखील ओळख आहे. पॉवरप्लेमध्ये बॅट्समनने मारलेल्या जोरदार शॉट अडवण्यासाठी बॉण्डरीवर जास्त खेळाडू नसतात. त्यामुळे बॉलिंग टाकताना अनेक बॉलर पेचात पडतात. मात्र संदीपला पॉवरप्ले स्पेशालिस्ट म्हंटलं जातं. आयपीएलमध्ये पॉवरप्ले असताना सगळ्यात जास्त विकेट घेण्याचा विक्रम संदीपच्या नावावर आहे.

दुसरीकडे प्रसिद्धी मिळवलेल्या खेळाडू जसप्रीत बुमराहच्या प्रदर्शनात आणि संदीपच्या प्रदर्शनात बरेच साम्य आहे. बुमराह आणि संदीपचे आयपीएल प्रदर्शन-

संदीपच्या आणि बुमराहच्या प्रदर्शनात खूप साम्य आहे. मात्र तरीही संदीपला बुमराह इतकी प्रसिद्धी मिळाली नाही.इतकेच नाही तर तो ज्या संघात खेळतो त्याच्यातही तो अंतिम ११ खेळाडूंमध्ये असेलच असे नाही. त्यामुळे आता बुमराहसारखे सातत्य संदीपला आणण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.