बापरे! बॉडीगार्ड म्हणून काम करणारा शेरा पगार म्हणून घेतो ‘इतके’ करोड रुपये

0

 

सेलिब्रिटी नेमहीच आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत येत असतात. सध्या बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या दबंग ३ शुटींगमुळे चर्चेत आला आहे.

काही दिवसांपुर्वी दबंग ३ च्या सेटवरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात सलमान खानच्या चाहत्यांनी खुप गर्दी केल्याचे दिसून येत होते. पण त्यावेळी एक अशी व्यक्ती होती जी त्या जमावापासून सलमानला वाचवत होती, ती व्यक्ती म्हणजे सलमानचा बॉडीगार्ड शेरा.

शेरा गेल्या २० वर्षांपासून सलमानचा बॉडीगार्ड आहे. शेराचे खरे नाव गुरमीत सिंग जॉली आहे. चला तर मग आज जाणून घेऊया सलमान खानचा बॉडीगार्ड शेराबद्दल..

शेरा शिख कुटुंबातून येतो, त्याला लहानपणापासूनच बॉडी बिल्डींगचा शौक होता. त्यामुळे शेरा १९८७ चा ज्युनियर मिस्टर मुंबई ठरला होता, तर त्याच्या पुढच्या वर्षी तो ज्युनियर वर्गात मिस्टर महाराष्ट्र म्हणून निवड झाली होती.

शेराचे वडिल मुंबईत वाहने रिपेअर करण्याचे काम करायचे. त्याचे वडिल त्याला प्रेमाने शेरा बोलायचे. सुरुवातीला जेव्हा हॉलिवूडच्या चित्रपटांचे शुटींग झाले होते तेव्हा तो काही कलाकारांचा बॉडीगार्ड बनला होता.

१९९५ मध्ये जेव्हा सलमान खानचे दुसऱ्या देशात चित्रपटासाठी शुटींगला जायचे होते, तेव्हा सोहेल खानने शेराच्या कंपनीकडून सर्विस मागितली. एकेदिवशी सोहेल खानने शेराला ऑफिसला बोलावले आणि एका शोसाठी सलमानचा बॉडीगार्ड बनशील का? असे विचारले तर शेराने होकार दिला.

शेराचे काम पाहून सलमानने त्याला कायमचेच बॉडीगार्ड बनून टाकले. त्यानंतर शेरा सलमान खानसोबत प्रत्येक ठिकाणी बॉडीगार्ड म्हणून जाऊ लागला. आता तर तो सलमान खानच्या कुटुंबाचा एक सदस्यच बनला आहे.

बॉलिवूडमध्ये सलमान खानला आपली दोस्ती निभावण्यासाठी ओळखले जाते. शेराची आणि सलमानची दोस्तीही अशीच काहीशी आहे. शेरा सलमानचे एका मित्रासारखे संरक्षण करतो.

शेरा मुंबईमध्ये सलमान खानच्या घरा शेजारीच राहतो. सलमानच्या बोलण्यावरुन शेराने एक इवेंट कंपनी सुद्धा उघडली आहे. तसेच त्याने एक सिक्युरीटी पुरवणारी कंपनी उघडली आहे. जी सेलिब्रिटांना सुरक्षा पुरवते. सलमान खानचे बॉडीगार्डचे काम करण्यासाठी शेरा वर्षाला २ कोटी रुपये घेतो.

सलमानला कुठेही जायचे असेल तर शेरा एक दिवस आधी त्या ठिकाणी जातो. बऱ्याचदा चाहत्यांची गर्दी कमी करण्यासाठी तो ४ ते ५ किलोमीटर चालतो. एकदा तर तो चक्क ८ किलोमीटर चालला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.