नादच खुळा! चंद्रपुरातल्या शेतकऱ्याने शेतीत केला एक प्रयोग आणि झाला मालामाल

0

 

 

शेतकरी शेतात नेहमीच नवीनवीन प्रयोग करताना दिसून येतात. अनेकदा शेतकरी त्यांच्या प्रयोगात यशस्वी होऊन मालामाल होतात, आजची ही गोष्ट  पण अशाच एका शेतकऱ्याची आहे ज्याने शेतीत एक प्रयोग केला आहे आणि तो मालामाल झाला आहे.

चंद्रपुर जिल्ह्याच्या बोरी नवेगाव येथे राहणारे शेतकरी साईनाथ कुंभारे हे नेहमीच शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांची एकोणावीस एकर शेती आहे.

कुंभारे यांनी सध्या बटाट्याचे पीक घेतले आहे. त्यांनी उत्तम व्यवस्थापन आणि वेळोवेळी कृषी विभागापासून मिळालेल्या मार्गदर्शनाकडून त्यांनी शेतात ६० ते ७० क्विंटल  बटाट्याचे घेतले आहे.

कुंभारे महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे, तसेच ते शेतकरी असून नेहमीच शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात. यावेळी त्यांनी टरबुज आणि खरबुजाची शेती केली होती.

त्यानंतर त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बटाट्याची शेती करताना पाहिले होते, त्यामुळे त्यांनी बटाट्याची शेती करण्याचा निर्णय घेतला.

बटाट्याच्या शेतीबद्दल त्यांनी संपुर्ण माहिती काढली. तसेच लातूरमधून त्यांनी बटाट्याचे बेने आणली. त्यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये त्याची लागवड केली. फक्त चार महिन्यातच कुंभारे यांनी ६० ते ७० क्विंटलचे उत्पादन घेतले. बटाट्याचे उत्पादन घेण्यासाठी कुंभारे यांना एकरी ४० हजार इतका खर्च आला होता.

कोपरना तालुक्यात आदर्श शेतकऱ्यांचा एक गट आहे. ते शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. आजपर्यंत या गटाने खरबुज, टरबूज, आले, हळद, ऊस, केळी, अशा विविध पिकांचे प्रयोग त्यांनी आतापर्यंत केले आहे. ते बघून शेतकरी आपल्या शेतात प्रयोग करत असतात.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.