वाचा सचिन तेंडूलकरने आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत कोणकोणते रेकॉर्ड बनवले

0

आजची तारीख क्रिकेट प्रेमींना नेहमी लक्षात राहील. कारण आजच क्रिकेटच्या देवाचा जन्म झाला होता. तारीख होती २४ एप्रिल आणि वर्ष होते १९७३. या दिवशी, एक क्रिकेटर जन्माला आला ज्याने अगदी लहान वयातच जे स्थान मिळवले होते ते मोठमोठ्या खेळाडूंनासुद्धा मिळवता नव्हते आले.

सचिन रमेश तेंडूलकर. असंख्य विक्रम करणारा एकमेव क्रिकेटपटू. सचिनने स्वताच्या फलंदाजीची स्क्रिप्ट स्वताच लिहीली जी सगळ्यांच्या लक्षात राहिली. सचिनने फक्त रेकॉर्डच नाही बनवले तर त्याने लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. सचिन एक भावना आहे.

या देशात क्रिकेटला नवीन उंचावर पोहोचवण्यास मदत करणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याचे आज नाव आहे. त्याच्यामुळे पुढील पिढीलाही नवीन प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. ज्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते आणि या देवाचा प्रवास लहानपणापासूनच सुरू झाला होता ज्यामध्ये सचिनने अनेक रेकॉर्ड करून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले होते.

वयाच्या १२ व्या वर्षी त्याने १७ वर्षांखालील हॅरिस शिल्डमध्ये शाळेसाठी शतक झळकवले. जेव्हा सचिन १४ वर्षांचा होता तेव्हा त्याने त्याचा जिवलग मित्र विनोद कांबळी याच्यासह ६६४ धावांची विक्रमी भागीदारी रचली होती. ही त्यावेळची सर्वात मोठी भागिदारी होती. त्यावेळी सचिनला खेळताना पाहून अनेकांना सचिन काय आहे आहे आणि काय करू शकतो हे कळाले होते.

वयाच्या १५ व्या वर्षी त्याने मुंबईत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतरच्या वर्षी तो भारतीय संघात सहभागी झाला. त्याने पहिला कसोटी सामना १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध कराची येथे खेळला होता. वयाच्या १७ व्या वर्षी इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर त्याने पहिले कसोटी शतक झळकावले. तो भारतासाठी कसोटीमध्ये शतक झळकवणारा सर्वात युवा खेळाडू होता.

पण सचिनची कहाणी लहान वयात विक्रम करणे किंवा फलंदाजीद्वारे चमत्कार करणे इथपर्यंतच मर्यादित नाही. हा तर कथेचा फक्त एक भाग आहे. त्यापलीकडे सचिनची एक वेगळी कहाणी आहे. सचिनने तारुण्यात जे काही साध्य केले ते तर त्याच्या पुढील कारकिर्दीचा फक्त एक ट्रेलर होता.

सचिन तेंडुलकरने तारुण्यात जे काही साध्य केले त्यापेक्षा जास्त त्याने नंतरच्या काळात मिळवले. २००० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतके झळकावणारा तो पहिला क्रिकेट खेळाडू ठरला. २००३ मध्ये त्याने वर्ल्ड कपमध्ये ६७३ धावा केल्या. जगातील हा सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.

२००८ मध्ये, त्याने ब्रायन लाराला मागे सोडले आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. वयाच्या ३६ व्या वर्षी त्याने वनडे क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावले. पुरूषांच्या क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला होता.

कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा आणि शतके करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकणारा तो एकमेव क्रिकेट खेळाडू आहे. २०१३ मध्ये त्यांनी मुंबईच्या वानखेडे मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. क्रिकेटप्रेमींना आणि सचिनच्या चाहत्यांना यातील बऱ्याच गोष्टी माहीत असतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा आणि जर माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.