लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून सुरु केली शेती, आता करतोय करोडोंची कमाई

0

 

 

आजकाल अनेक लोक नोकरी मिळत नसल्याने शेती व्यवसायाकडे जाताना दिसून येतात, पण आज आम्ही अशा एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत ज्या माणसाने लाखोची नोकरी सोडून शेती सुरु केली आणि आता तो शेतीतून करोडो रुपयांची कमाई करत आहे.

आजची ही गोष्ट छत्तीसगडच्या बिलासपुरमध्ये राहणाऱ्या या माणसाचे नाव सचिन काळे असे आहे. सचिन यांनी लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून शेती सुरु केली, आता ते या शेतीतून करोडोंची कमाई तर करतच आहे, तसेच ते आता अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.

सुरुवातीला सचिन काळे कॉन्ट्रॅक्टवर शेती करायचे. तेव्हा त्यांनी शेतीचा खुप अभ्यास केला आणि २०१४ मध्ये त्यांनी इनोवेटिव एग्रीलाईफ सॉल्युशन प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. सचिन यांची कंपनी शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्टवर शेती करण्यास मदत करते.

सचिन यांनी २००० मध्ये नागपुरच्या इंजिनियरिंग कॉलेजमधून बीटेकचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी फायनान्समध्ये एमबीए केले आहे. इतके शिक्षण घेतल्यानंतर त्यांना पॉवर प्लांटमध्ये नोकरीसुद्धा लवकर मिळाली. नोकरी करत असताना त्यांनी इकोनॉमिक्समध्ये पीएचडी सुद्धा पुर्ण केली.

नोकरीत त्यांचे मन लागत नव्हते, त्यामुळे त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पण व्यवसाय करायचा कोणता असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. तेव्हा त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १५ एकर शेतीपासून सुरुवात केली. पण त्यांना माहित नव्हते की पीक कोणते लावायचे.

त्यामुळे त्यांनी जवळपासच्या शेतकऱ्यांची मदत घेतली आणि शेतीला सुरवात केली, पण सचिन यांचे स्वप्न वेगळेच होते. त्यांनी जवळपासच्या शेतकऱ्यांची शेती भाडेतत्वावर घेतली आणि ती शेती त्यांना आपल्या पद्धतीने करण्यास सांगितली. त्यासाठी त्यांना १५ वर्षांची पीएफ तोडली आणि मिळालेल्या पैशातून शेतीला सुरुवात केली.

आज त्यांच्या कंपनीसोबत १३७ शेतकरी जोडले गेले असून ते २०० एकरपेक्षा जास्त जमिनीवर शेती करत आहे. सचिन यांच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा कंपनीत काम करत आहे. या व्यवसायातून ते वर्षाला २ कोटींची उलाढाल करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.