अक्षय कुमारचा रूस्तम सगळ्यांनीच पाहिला असेल पण खऱ्या रूस्तमची कहाणी तर वेगळीच होती

0

आज आम्ही तुम्हाला रूस्तम या चित्रपटाशी निगडीत असलेली खरी कहाणी सांगणार आहोत. ७० वर्षांहून अधिक काळ कारकीर्दीत असलेले, प्रख्यात वकील राम जेठमलानी यांनी अनेक प्रकरणात आपले मुद्दे मांडले आणि जनतेचे लक्ष वेधून घेतले होते.

हवाला घोटाळ्यातील लालकृष्ण अडवाणींच्या बचावासाठी आणि अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्याविरूद्ध लढा देण्यासाठी जेठमलानी यांनी स्टॉक ब्रोकर हर्षद मेहतापासून ते उच्च पदाच्या अनेक दिग्गजांच्या त्यांनी केस लढल्या आहेत.

पण एक काळ होता तेव्हा ते सगळ्यात जास्त चर्चेत आले होते. हे प्रकरण होते १९५९ चे केएम नानावटी प्रकरण. या घटनेने लोकांचे लक्ष वेधून घेतले. नेव्ही कमांडर कावस मानेकशा नानावटीने आपली ब्रिटीश पत्नी सिल्व्हियाचा प्रियकर प्रेम आहुजा याला बेडरूममध्ये जाऊन गोळ्या घालून ठार केले होते. हत्येनंतर त्यांनी नानावटीतील मुंबईतील पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले.

नानावटी यांच्यावर कलम २०२ आणि ज्युरी ट्रायल अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाचणी दरम्यान नानावटी संपूर्ण युनिफॉर्ममध्ये असायचे. त्यांच्या डिफेंमुळे नानवटी यांना एक योग्य आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख करुन दिली होती.

जो आपल्या एकट्या व कमजोर पत्नीपासून दूर देशाची सेवा करण्यासाठी समर्पित होते. त्याच वेळी, आहुजाला अनैतिक आणि मुलींची फसवणूक करणारा व्यक्ती म्हणून दाखवण्यात आले होते. सिल्व्हीयाही त्याच्या जाळ्यात अडकली होती. ही बाब पारसी आणि सिंधी समाजात झाली होती.

या समाजातून नानावटी आणि आहुजा हे दोघे येत होते. दोन्ही बाजूंचे त्यांचे स्वतःचे नरेटीव्ह होते जे दोन्ही पक्ष लोकांपर्यंत पोहोचवत होते. आपल्या पत्नीच्या सन्माना रक्षण करण्याचे काम करताना नानावटी दिसत होते आणि जनतेचा कौलही त्यांच्याच बाजूने होता.

नानावटीच्या बचावादरम्यान असा दावा करण्यात आला होता की नानावटी अहुजाच्या घरी हे विचारण्यास गेले होते की जर तुझे सिल्व्हीयावर प्रेम असेल तर मी तिच्यापासून घटस्फोट घ्यायला तयार आहे. सुरुवातीला राम जेठमलानी कोणत्याच पक्षाच्या बाजूने बोलत नव्हते.

पण आहूजाची बहीण मिमीने कायदेशीर संघात जेठमलानी होते. तरुण वकील म्हणून जेठमलानी थोडक्यात या प्रकरणात आपली बाजू मांडत होते, पण या प्रकरणात त्याच्या सहभागामुळे त्यांनी कराची ते बॉम्बेमध्ये खुप प्रसिद्धी वाढली. २३ सप्टेंबर १९५९ रोजी या प्रकरणातील जूरीचा धक्कादायक निर्णय आला, जेव्हा नानावटी यांना प्रकरणात दोषी ठरविण्यात आले नाही.

परंतु न्यायालयीन मंडळाच्या या निर्णयाला न्यायाधीशांनी चुकीचे घोषित केले. यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पाठविण्यात आले. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर राम जेठमलानी थेट या प्रकरणात आहुजाची बाजू घेत होते. या प्रकरणात जेठमलानी हे कनिष्ठ वकील होते.

परंतु त्यांनी या प्रकरणात कठोर परिश्रम घेतले. जेठमलानींनी असा युक्तिवाद केला की जर गोळ्या भांडण झाल्यानंतर झाडण्यात आल्या होत्या तर गोळ्या झाडण्यानंतरही आहुजाचे टॉवेल कंबरेलाच का बांधलेले होते? त्यांच्या या आवाहनामुळे बचावाची बाजू कमकुवत झाली. मुंबई उच्च न्यायालयाने नानावटी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

जेठमलानींच्या या युक्तीवादामुळेच ११ मार्च १९६० रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नानावटी यांना आहुजाच्या हत्येसाठी दोषी ठरवले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. काही तासांतच, मुंबईच्या राज्यपालांनी अभूतपूर्व आदेश जारी केला आणि दोषींच्या अपिलावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत जन्मठेपेची शिक्षा निलंबित केली.

त्यावर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की राज्यपालांनी आपल्या अधिकारांचा अनावश्यक वापर केला होता आणि शिक्षा निलंबित करून त्यांच्या आदेशांवर हल्ला केला होता. तीन दिवसांनी नानावटीला तुरूंगात पाठवण्यात आले. १९६३ मध्ये त्यांना आरोग्याच्या कारणास्तव पॅरोल देण्यात आला आणि यावेळी ते एका हिल रिसॉर्टमध्ये गेले.

१९६४ मध्ये, मुंबईच्या नवीन राज्यपाल आणि जवाहरलाल नेहरूंची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांनी नानावटीला माफ केले. यानंतर नानावटी आणि सिल्व्हिया त्यांच्या तीन मुलांसह १९६८ मध्ये कॅनडाला गेले जेणेकरून ते आपले उर्वरित आयुष्य बदनामीच्या डागांपासून दुर घालवू शकतील.

जुलै २००३ मध्ये नानावटी यांचे निधन झाले. या सनसनाटी प्रकरणावर बरीच पुस्तके आणि चित्रपट बनले आहेत. त्यामध्ये अक्षय कुमारच्या रूस्तम या चित्रपटाचाही समावेश आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.