हातगाडीवर काम करणारी मुलगी ते प्रसिद्ध अभिनेत्री; कसा होता रुपाली भोसलेचा प्रवास

0

 

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठं काय करते’ मालिका सध्या खुप जास्त प्रसिद्ध आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या मालिकेने झी मराठी आणि कलर्स मराठी वाहिन्यांवरील मालिकांना देखील मागे टाकले आहे. ही मालिका सध्या टेलिव्हिजनवरील टॉपची मालिका आहे.

या मालिकेतील सर्व कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आहे. मालिकेत संजनाची भुमिका निभावणारी अभिनेत्री रुपाली भोसले खुप प्रसिद्ध झाली आहे. रुपालीच्या अगोदर अभिनेत्री दिपाली पानसरे संजनाची भुमिका निभावत होती. लॉकडाऊननंतर दिपालीने ही मालिका सोडली आणि दिपालीच्या जागी रुपालीने मालिकेत एन्ट्री केली.

सुरुवातीला रुपालीला या भुमिकेत स्वीकारणे कठीण होते. पण आत्ता मात्र रुपालीला प्रेक्षकांनी संजना म्हणून स्वीकारले. ती सध्या संजना म्हणून प्रसिद्ध झाली आहे. या मालिकेच्या अगोदर रुपालीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. जाणून घेऊया रुपालीचा अभिनय क्षेत्रातील प्रवास.

रुपाली भोसलेने मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सब टिव्हीवरील ‘बडी दुर से आये है’ मालिकेत तिने महत्वाची भुमिका साकारली होती. रुपाली खऱ्या अतिशय ग्लमर्स आहे. सध्याच्या घडीला ती टेलिव्हिजवरील टॉपची अभिनेत्री आहे. तिचे लाखो चाहते आहेत.

रुपाली भोसलेचा जन्म २९ डिसेंबर १९८३ ला मुंबईत झाला होता. घरची परिस्थिती बेताची असल्यामूळे तिचे कुटूंब मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर घर चालवण्यासाठी तिच्या आईने हातगाडीवर खाणावळ सुरु केली. शाळा आणि कॉलेज झाल्यानंतर रुपाली तिच्या आईला मदत करण्यासाठी हातगाडीवर काम करायची.

कॉलेजमध्ये असताना रुपालीने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. कारण तिला लहानपणापासून अभिनेत्री व्हायचे होते. हळूहळू रुपालीला नाटकांमध्ये चांगले यश मिळत होते. काही दिवसांनी तिला ‘एक झोका नियतीचा’ मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले होते.

त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. २०१२ मध्ये तिने लंडनमधील एका व्यवसायिकासोबत तिचे लग्न झाले. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. थोड्या दिवसांमध्येच हे दोघे वेगळे झाले. यातूनही रुपालीने स्वत:ला सावरले. तिने परत एकदा अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

यावेळेस रुपालीने हिंदी मालिकेतून कमबॅक केला. सब टिव्हीच्या ‘बडी दुर से आये है’ मालिकेत तिने काम केले. हि मालिका खुप जास्त हिट झाली होती. त्यानंतर तिने मराठी बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता. या दोन्ही कार्यक्रमांमूळे ती खुप प्रसिद्ध झाली होती.

रुपालीचे कमबॅक खुप चांगले झाले. तिला आई कुठे काय करते मालिकते काम करण्याची सधी मिळाली. या मालिकेतील तिच्या कामाला लोकांनी खुप पसंत केले आहे. ती सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती तिच्या फॅन्ससोबत रोज नवीन गोष्टी शेअर करत असते.

Leave A Reply

Your email address will not be published.