रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘त्या’ खेळाडूचा पहिलाच टी-ट्वेंटी सामना ठरला होता अखेरचा

0

 

भारतीय संघाचे रनमशीन म्हटलं, तर आपल्याला पटकन आठवतो तो भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली. पण तुम्हाला हे माहित आहे का? त्याच्या आधीही भारताचा एक खेळाडू रनमशीन म्हणून ओळखला जायचा, पण त्याचे करियर संपले ते म्हणजे सचिन, गांगुली, द्रविड आणि लक्ष्मण यांच्यामुळे.

भारताचा हा रनमशीन होता सुब्रमण्यम बद्रिनाथ. त्याच्या मैदानावरच्या तंत्रशुद्ध शॉट्समुळे अनेकांना भुरळ पडली होती. त्याने भारतीय संघात खेळताना कमालीची खेळी खेळली होती, पण त्याच्या सचिन, गांगुली, द्रविड आणि लक्ष्मण यांच्यामुळे क्रिकेटमधली कारकिर्द कधी संपली हे कोणाला कळलही नाही.

बद्रिनाथचे हा तामिळनाडूचा होता. त्याची ओळख मिस्टर डिफेंडेबल जायचे. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १० हजार धावा केल्या होता. तर त्याने आयपीएलमध्ये चेन्नईकडून सुद्धा दमदार कामगिरी केली होती, पण त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी खेळण्याची खुपच कमी मिळाली.

२००५-०६ मध्ये सुब्रमण्यम बद्रिनाथने फर्स्ट क्लास क्रिकेटच्या ७ सामन्यांमध्ये ६३६ धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे त्याला तामिळनाडूच्या भारतीय संघात कर्णधारपदी स्थान मिळाले. पण तरीही त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.

अखेर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले ते २००७ मध्ये, जेव्हा भारतीय संघ झिम्बावे दौऱ्यावर होता. त्यावेळी त्याने दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्याला २००७ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघामध्ये जागा मिळाली पण तो प्रत्यक्ष ११ खेळाडूंमध्ये नव्हता, त्यामुळे तिथे त्याला कामगिरी दाखवता आली नाही.

सुब्रमण्यम बद्रिनाथने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्ममॅटमध्ये धडाकेबाज खेळी केली होती. त्याने पहिल्या कसेटी सामन्यात अर्धशतक ठोकले होते. तर वनडेमध्ये त्यानेच भारताला सामना जिंकून दिला होता. इतकेच नाही, तर टी-ट्वेंटीच्या पहिल्याच सामन्यात तो सामनावीर ठरला होता. पण तोच टी-ट्वेंटी सामना त्याच्या भारतीय संघातील टी-ट्वेंटी सामन्यामधला अखेरचा सामना ठरला होता.

त्याकाळात भारतीय संघात फलंदाजांची गरज नव्हती, कारण त्यावेळी सगळेच फलंदाज तगडे होते. अशात त्याने सचिन, द्रविड, गांगुली आणि लक्ष्मण यांसारख्या दिग्गजांच्या उपस्थितीत मला जागा मिळणे कठिणच होते, असे त्याने एकदा म्हटले होते. तसेच जर मी फलंदाजीसोबत गोलंदाजीही केली असती, तर ऑलराऊंडर म्हणून मला संघात नक्कीच स्थान मिळाले असते, असेही त्याने म्हटले होते.

सुब्रमण्यम बद्रिनाथला भारतीय संघाकडून खुप कमी खेळण्याची संधी मिळाली, पण त्याने जेवढी खेळी केली तेवढी दमदारच होती. इतकेच नाही, तर तो एक उत्तम फिल्डर सुद्धा होता, पण त्याची मेहनत आणि त्याची खेळ त्यावेळी भारतीय संघात कामी नाही आली आणि लवकरच त्याचे करियर संपले.

Leave A Reply

Your email address will not be published.