या माणसाने सुरु केलाय झाडांचा दावाखाना, झाडांच्या ३२ रोगांवर होणार उपचार तेही फुकटात

0

 

 

आतापर्यंत तुम्ही माणसाच्या आणि जनावरांच्या रोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाहिले असेल किंवा दवाखाने पाहिले असतील पण तुम्ही कधी झाडांवर उपचार करणाऱ्या दवाखान्याबद्दल ऐकले आहे का?

आज आम्ही तुम्हाला एका अशा माणसाबद्द सांगणार आहोत, ज्या माणसाने झाडांवर उपचार करण्यासाठी ऍम्बुलन्स सेवा सुरु केली आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये राहणाऱ्या माणसाचे नाव रोहित मेहरा असे आहे.

रोहित मेहरा यांनी अमृतसरमध्येच झाडांचा उपचार करण्यासाठी एक ऍम्बुलन्स तयार केली आहे. या ऍम्बुलन्सच्या मदतीने झाडे आणि रोपटे दोघांवर उपचार करता येतात. या ऍम्बुलन्सच्या मदतीने जवळपास ३२ आजारांवर उपचार करता येतात.

रोहित यांनी म्हटले आहे की, जर तुम्ही पाहिलेले रोपटे किंवा झाड सुकले असेल तर त्याला तोडून टाकू नका, मला संपर्क साधा मी त्याचा उपचार करेल.

रोहित मेहरा यांनी झाडांवर उपचार करण्यासाठी एक ऍम्बुलन्स तयार केली आहे. ज्या वक्तींना त्यांच्या झाडांवर उपचार करायचा असेल, त्यांनी ८९६८३३९४११ या संपर्क साधून माहिती द्यावी, त्यानंतर टीम त्या ठिकाणी येऊन झाडांची तपासणी करते.

या ट्रि ऍम्बुलन्सला त्यांनी पुष्पा ट्रि अँड प्लांट हॉस्पिटल अँड डिस्पेंसरी असे ठेवले आहे. ही सेवा पुर्ण अमृतसरमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ही पुर्ण सेवा मोफत दिली जाणार आहे.

झाडांवर उपचार करण्यासाठी रोहित मेहरा हे आयुर्वेदिक पद्धतीचा उपयोग करणार आहे. रोहित मेहरा यांनी झाडांना पुन्हा जीवंत करण्यासाठी एक विशेषतज्ञांची टीम बनवली आहे. जे झाडांवर चांगल्या पद्धतीने उपचार करु शकतील. या टीममध्ये ८ बोटनिस्ट आहे, तर ५ साइंटिस्ट आहे

Leave A Reply

Your email address will not be published.