साताऱ्याच्या ‘या’ पठ्ठ्याने फक्त घरचेच जेवण करून बनवली अशी बॉडी, की आमिर खानलाही पडली भुरळ

0

 

आजकाल बॉडी बनवणे हा तरुणांसाठी एक ट्रेंड बनला आहे. अनेक तरुण जिम लावत असतात, अनेक स्पेशल ट्रेनरकडून ट्रेनिंग आणि टिप्सदेखील घेतात. मात्र यासाठी पैसेदेखील तेवढेच खर्च करावे लागतात.

आजची हि साताऱ्याच्या अशा एका तरुणाची आहे, ज्याने ट्रेंड म्हणून नाही तर आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बॉडी बनवली आहे. त्याच्या तब्बेच सगळीकडेच चर्चा असून बॉलिवूड अभिनेती आमिर खानला सुद्धा या तरुणाच्या तब्बेतीची भुरळ पडली आहे.

साताऱ्यात राहणाऱ्या या तरुणाचे नाव रोहित बनसोडे आहे. जिम मालकाने पैशांच्या कारणामुळे वडिलांसमोरच त्याचा अपमान केला होता. हा अपमान त्याला सहन झाला नाही आणि तिथुनच त्याचा बॉडीबिल्डर बनण्याचा प्रवास सुरु झाला.

सातारा जिल्ह्याच्या गोंदवले गावात राहणारा रोहित शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी गेला होता. कॉलेज झाल्यानंतरच्या मोकळ्यावेळेत काय करायचे म्हणून त्याने जिम लावण्याचा विचार केला. त्यासाठी तो आपल्या वडिलांना घेऊन जिममध्ये गेला.

जेव्हा तो जिममध्ये गेला तेव्हा पैशांमुळे त्याचा खुप अपमान झाला. रोहितचा अपमान त्याच्या वडिलांसमोर झाल्याने तो अपमान त्याला सहन झाला नाही आणि तिथेच त्याने आपली बॉडी बनवण्याचा निर्णय घेतला.

रोहितने व्यायामाला सुरुवात केली, तो रोज घरासमोरच्या डोंगरावर व्यायामासाठी जाऊ लागला. तिथे तो तिथे धावू लागला, तिथे असणाऱ्या झाडाला लोंबकळायला सुरुवात केली. त्याला २-३ महिन्यात आपल्या शरिरात बदल वाटू लागला.

रोहितला त्याच्या वडिलांनी डोंगरावर असणाऱ्या दगडांना खांद्यावर घेऊन लांब फेकण्याचा सल्ला दिला. रोहित रोज आपल्या खांद्यावर १५ ते २० किलोचा दगड उचलायचा आणि १० ते १२ फुट लांब फेकायचा. दिवसातुन तो हा प्रकार ४० ते ५० वेळा करु लागला.

घरची परिस्थिची गरिबीची असल्याने त्याने तब्बेत बनवण्यासाठी विशेष आहार घेतला नाही. त्यामुळे रोहितची आई त्याच्यासाठी रात्री जेवण बनवून ठेवायची, जेणे करुन मुलाला सकाळी उठून व्यायाम करुन झाला की आधी जेवण करता येईल.

रोहित रोज सकाळी पाच-साडेपाचला उठायचा आणि व्यायाम करायचा. त्यानंतर तो पहिल्यांदा साडे सहा वाजता जेवायचा. त्यानंतर पुन्हा १०, परत दुपारी आणि संध्याकाळी ५ वाजता आणि पुन्हा रात्री असा तो दिवसातुन पाचवेळा जेवण करायचा.

आमिर खान यांचा कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’मधली चिमणीची कथा रोहितने ऐकली, ती ऐकून रोहित खूप प्रेरित झाला आणि त्याने गावातला दुष्काळ कायमचा मिटवता येईल का यासाठी तो प्रयत्न करू लागला.

त्यातूनच त्याने आणि त्याच्या बहिणीने मिळून विहीर खोदली. चारी खोदल्या आणि त्यात पाणी जिरवले. तसेच त्याने हजारो झाडे लावली आणि पाण्याचे कॅन वाहून त्या झाडांना पाणी देऊन ती झाडी जगवली.

त्याने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून श्रमदानाने काम केले. या सर्व कामांमध्ये एकदा पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये रोहितच भेट आमिर खानशी झाली.

तेव्हा रोहितला पाहताच आमिर खान म्हणाला, ‘वाह तब्बेत असावी तर अशी.’ हे ऐकताच रोहित खूप आनंदी झाला कारण इतक्या प्रसिद्ध अभिनेत्याने त्याचे कौतुक केले होते. तसेच आमिरने घरी येण्याची इच्छाही व्यक्त केली होती, असे रोहितने म्हटले आहे.

रोहितला पुढे लष्करात भरती होऊन देशसेवा करायची इच्छा आहे. ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आणि त्या दृष्टीने जर मेहनत घेतलं तर जीवनात अशक्य असे काही नाही, हे रोहितने सिद्ध करून दाखवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.