चालता बोलता चहा विकुन ‘हा’ पठ्ठ्या कमवतोय महिन्याला ५५ हजार

0

कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेक लोक आर्थिक संकटात सापडले आहे. अशात काही लोकांनी या लॉकडाऊनचा संधी म्हणून उपयोग केला आहे.

आज आपण अशाच एका माणसाची गोष्ट जाणुन घेणार आहोत, त्यांचे नाव आहे रेवन शिंदे. कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात त्यात शिंदे यांची नोकरी पण गेली. ते सिक्युरिटी गार्डचे काम करायचे.

नोकरी गेल्यानंतर शिंदे यांच्याकडे दोन पर्याय होते, एक म्हणजे निराश होऊन घरी बसायचे आणि दुसरे म्हणजे काहीतरी वेगळे सुरु करायचे. त्यामुळे त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचे ठरवले. कोरोना संकटात त्यांनी लोकांची गरज ओळखली.

शिंदे यांना असे लक्षात आले कि लॉकडाऊनमध्ये हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या बंद झाल्या होत्या त्यामुळे लोकांना चहा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी चहा विकण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे हा चहा त्यांनी टपरी लावुन नाही, तर लोकांना पाहिजे तिथे आणून दिला.

२८ वर्षीय रेवन शिंदे लॉकडाऊनच्या आधी सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होते. तेव्हा त्यांना १२ हजार रुपये मिळत होते. मात्र त्यांनी अभिमन्यु नावाच्या या नविन संकल्पनाची सुरुवात केल्यानंतर त्यांना याचा चांगलाच फायदा झाला.

या व्यवसायातुन त्यांना महिन्याला ५० ते ५५ हजार रुपये मिळतात. या व्यवसायात त्यांच्यासोबत ५ जण अजुन चहा विकण्याचे काम करतात. पिंपरी चिंचवडच्या १० किलोमीटर परिसरात हा चालता बोलता चहा विकला जातो.

चहा विकणारे हे सर्व लोक आपल्या दुचाकीवरुन थर्मास, गरम पाणी, दुध, चहाची पाने, यांसारखी चहाची सर्व सामग्री ते घेऊन फिरतात. तसेच त्यांनी आपला संपर्क क्रमांक लोकांना दिला असुन त्यांना लोक फोन करुन बोलावून घेतात.

कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, पण संकटाच्या काळात पण एक संधी दडलेली असते. फक्त आपण त्या संधीचा शोध घेतला पाहिजे, असे रेवन शिंदे यांनी दाखवून दिले आहे. रेवान शिंदे यांची हि गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.