या माजी सैनिकाचा नादच नाय! चाळीस हजार खर्च आणि तीन लाखांपेक्षा जास्त नफा

0

एका माजी सैनिकाने अठ्ठावीस वर्षे देशांची सेवा केली, देशाच्या सीमेचे रक्षण केले आणि कारगील युद्धात शत्रूला धुळ चारली आणि निवृत्ती घेतली. पण त्यांना शेती करण्याची आवड निर्माण झाली.

त्यांनी शेतात कष्ट करत एका एकराच्या कलिंगडाच्या लागवडीतून तीन लाख साठ हजार रूपयांचे उत्पादन मिळवले आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की त्यांना ही लागवड करण्यासाठी फक्त ४० हजार खर्च आला होता.

हा खर्च वगळला तर त्यांना तीन लाख वीस हजारांचा निव्वळ नफा झाला आहे. एकिकडे शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा वाढत आहे तर दुसरीकडे या माजी सैनिकाच्या कामगिरीची सगळीकडे चर्चा होत आहे.

या माजी सैनिक शेतकऱ्याचे नाव आहे जलील अमिर पटेल. त्यांनी देशसेवेत २८ वर्षे सेवा केली. त्यांनी लान्सनायक, हवालदार मेजर आदी हुद्यावर काम केले. कारगिल युद्धातही ते सहभागी होते.

आर्मीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेती करण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडे ८ एकर शेती आहे. त्यात त्यांनी कलिंगड, खरबूज या फळांची लागवड करतात. त्यांनी शेती कशी परवडत नाही याचा अभ्यास केला? नवनवीन प्रयोग करत त्यांनी तंत्रज्ञानाच्या जोरावर फळपिके घेण्यास सुरूवात केली.

गेल्यावर्षी त्यांनी कलिंगडची लागवड केली होती पण लॉकडाऊनमूळे त्यांचे कलिंगड अडकले. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी गावोगावी ट्रॅक्टरद्वारे घरपोच कलिंगडे देण्यास सुरूवात केली. अनेकांनी ही फळे फेकून दिली पण या शेतकऱ्याने निव्वळ नफा कमावला.

यंदाच्या वर्षी त्यांनी मॅक्स जातीच्या कलिंगडाची लागवड केली. गेल्या वर्षीचेच मल्चिंग पेपर त्यांनी पुन्हा वापरले. आवश्यक त्या खतांचा वापर केला आणि आवश्यक त्या औषधांचा वापर त्यांनी केला. या वर्षी एका एकरात त्यांनी तब्बल ४२ टनाचे उत्पादन घेतले.

त्यांनी साडेआठ रुपये किलो दराने व्यापाराला कलिंगड दिले. हा माल त्यांनी दिल्ली, बेल्लारी या ठिकाणी विक्रिसाठी घेतला जात आहे. एका फळाचे वजन जवळपास दहा किलो तर किमान अडीच किलो आहे. त्यांचा माल चांगला असल्यामुळे त्यांच्या शंभर टक्के मालाची विक्री होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.