‘अशा’ पद्धतीने शेती करून ३० गुंठ्यात घेतले १० टन टरबूजांचे उत्पन्न अन् दोन महिन्यात कमावले लाखो रुपये

0

 

अनेकदा शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून पाहत असतात. तसेच या नवनवीन प्रयोगामुळे काही शेतकरी भरघोस कमाई करताना आपया दिसून येतात. आजची ही गोष्ट पण अशाच एका शेतकऱ्याची आहे.

देवळातल्या एक शेतकऱ्याने शेतीला आधुनिक पद्धतीची जोड देऊन शेती केली आहे. या शेतकऱ्याने ३० गुंठ्यात १० टन टरबूजांचे उत्पादन घेतले आहे. या शेतकऱ्याचे नाव रविंद्र देवरवाडे असे आहे.

शेतात पीक घेतले तर योग्य भाव मिळत नाही, बाजारपेठ मिळणेही कठीण असते, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे असते. असे असताना जर आपण चांगल्या प्रतीचे पीक उत्पादित केले तर चांगल्या बाजारभावासह बाजारपेठही मिळते हे रवींद्र यांनी दाखवून दिले आहे.

रवींद्र यांनी नोन यु सिड्स अरोही आणि विशाला वानाचे रंगीत टरबूजाचे बियाणे आणून त्याची रोपे तयार केली आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी याची लागवड केली होती. हिरवे आणि आतून पिवळे असे ४०० रोपे तर वरून पिवळे आणि आतून लाल अशा पाच हजार रोपांची लागवड केली.

३० गुंठे क्षेत्रात त्यांनी ही लागवड केली होती. तसेच दोन महिन्यात त्यांनी फळाची तोड सुरू करून बाजारात विकण्यास सुरुवात केली. त्यांची फळे देशातल्या वेगवेगळ्या शहरांसोबतच त्यांची फळे आता दुबईमध्येही जाऊ लागली आहे.

या टरबुजाच्या उत्पन्नासाठी रवींद्र यांनी मिश्रा शेतीचा प्रयोग केला आहे. त्यांनी या शेतीत रासानिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर त्यांनी केला होता. या लागवडीतून त्यांना दोन महिन्यात दीड लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.