जेव्हा रावण मरणाच्या दारात होता तेव्हा त्याने लक्ष्मणाला दिले होते हे तीन उपदेश

0

रामायण काय आहे आणि का घडले हे सगळ्यांनाच माहित आहे. हिंदू धर्मासाठी रामायण हे खुप महत्वाचे मानले जाते. पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माणसांनी शिकण्यासारख्या आहेत. रामायणातील अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आजच्या काळात माणसाला खुप उपयोगी पडू शकतात. अशाच काही गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

यात काहीच शंका नाही की त्या काळात रावणासारखा दुसरा कोणताच पंडित नव्हता. त्यावेळी पुर्ण जगात रावणासारखा शिवभक्त सापडणार नाही. भगवान राम यांनाही रावणाचे सगळे गुण आणि अवगुण माहित होते आणि भगवान रामही रावणाचा आदर करायचे. हेच कारण आहे की जेव्हा भगवान रामांनी रावणाचा वध केला होता तेव्हा रावणाचे शेवटचे काही क्षण राहिले होते.

भगवान राम आपले बंधु लक्ष्मणाला म्हणाले की रावणाकडून काही उपदेश घेऊन ये. तेव्हा रावणाने जो उपदेश लक्ष्मणाला दिला होता तो उपदेश कदाचित तुमच्याही कामी येऊ शकतो. चला तर जाणून घेऊया रावणाने लक्ष्मणाला कोणते तीन उपदेश दिले होते. जेव्हा भगवान रामांची आज्ञा घेऊन लक्ष्मण जमीनीवर पडलेल्या रावणाकडे गेला तेव्हा तो रावणाच्या डोक्याच्या जवळ उभा होता.

तेव्हा लक्ष्मण बराच वेळ त्याच्या डोक्याजवळ उभा होता पण रावण त्याला काहीच म्हणाला नाही. तेव्हा लक्ष्मण पुन्हा रामाकडे आला आणि म्हणाला, रावण तर काहीच बोलत नाहीये. तेव्हा भगवान राम त्याला म्हणाले की, जेव्हा तुला कोणाकडून ज्ञान प्राप्त करायचे आहे तेव्हा त्याच्या पायाच्या बाजूला उभे राहावे डोक्याच्या बाजूला नाही. तेव्हा लक्ष्मण पुन्हा रावणाकडे गेला आणि यावेळी तो त्याच्या पायाजवळ उभा होता. तेव्हा रावणाने लक्ष्मणाला तीन उपदेश दिले होते.

पहिली गोष्ट रावणाने लक्ष्मणाला सांगितली की, शुभ कार्य जेवढे लवकर करता येईल तेवढे लवकर ते करून टाकावे. आणि अशुभ कार्य जेवढ्या लवकर टाळता येईल तेवढे लवकर ते टाळावे म्हणजे शुभस्य शीघ्रम. मी भगवान रामांना ओळखू शकलो नाही आणि मला त्यांच्या शरणामध्ये यायला उशीर झाला त्यामुळे माझी आज ही अवस्था झाली.

दुसरी गोष्ट अशी की कधीही आपल्या शत्रुला कमी समजू नये. मी ही खुप मोठी चुक केली. मी ज्यांना साधारण वानर आणि अस्वल समजलो होतो त्यांनी माझी पुर्ण सेना नष्ट करून टाकली. मी जेव्हा भगवान विष्णू यांना अमर होण्याचे वरदान मागितले होते तेव्हा मी त्यांना सांगितले होते की मनुष्य आणि वानर सोडून कोणीच माझा वध करून शकणार नाही असे वरदान मला द्या. कारण मी मनुष्य आणि वानरांना तुच्छ समजत होतो ही माझी चुक झाली.

रावणाने तिसरा आणि शेवटचा असा उपदेश दिला की, आपल्या जीवनात जर कोणते रहस्य असेल तर ते कधीच कोणाला सांगू नये. इथेही मी चुकलो कारण माझा भाऊ बिभीषण याला माझ्या मृत्युचे रहस्य माहीत होते. त्याला माहित होते की माझा मृत्यु कसा होऊ शकतो.

ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती. हे तीन उपदेश रावणाने लक्ष्मणाला दिले होते. आम्हाला खात्री आहे हे तीन उपदेश तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.