भारतीयांची कॉलर ताठ! रतन टाटांची टीसीएस कंपनी ठरली जगात सर्वात महागडी कंपनी

0

 

उद्योजक रतन टाटा यांची देशातील सर्वात मोठ्ठी आयटी कंपनी टाटा कंसल्टन्सी सर्विसेस म्हणजेच टीसीएस जगातील सर्वात मोठ्ठी कंपनी ठरली आहे. टीसीएसने ऐतिहासिक कामगिरी करत १६९.९ अब्ज डॉलर एवढं भांडवली मुल्य असणारी देशातील पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

टीसीएसने अमेरिकेतली सर्वात मोठी कंपनी ऍक्सेंचरला मागे टाकून जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी ठरली आहे. ऍक्सेंचरचे भांडवली मुल्य १६० अब्ज डॉलर होती पण शेअरची किंमत कमी झाल्याने आता तिचे भांडवली मुल्य १६७ डॉलर आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात टीसीएसचे शेअरमध्ये ८२ टक्कांनी वाढ झाली होती, त्यानंतर गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये ऍक्सेंचरला मागे टाकले होते.

गेल्यावर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक कंपन्या बुडाल्या, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अशात टीसीएस कंपनीने वर्कफ्रोम होम करत जगभरात उच्चांक गाठला आहे.

याआधीही टीसीएसने ऍक्सेंचरला तीनवेळा मागे टाकलेले आहे. पण यावर्षी तिने ऍक्सेंचरला मागे टाकत देशातीलच नाही, तर तर जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.

सध्या टीसीएस सगळ्यात आयटी क्षेत्रातली मोठी कंपनी ठरली असली, तरी टीसीएस सॉफ्टवेअर उद्योग क्षेत्रात इतर कंपन्यांमध्ये मागेच आहे. मायक्रोसॉफ्टचे बाजारमुल्य १.७ ट्रिलियन आहे.

टिसीएसने २ वर्षांपुर्वीच १०० अब्ज डॉलरचा भांडवली मुल्याचा टप्पा गाठला होता, त्यावेळी त्यांनी अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले होते. आता टिसीएस आयटी कंपन्यांमधली जगातली सर्वात महागडी कंपनी ठरल्याने भारतीयांची कॉलर चांगलीच ताठ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.