‘असा’ वाढवा आपला व्यवसाय; वाचा नवउद्योजकांना रतन टाटांनी दिलेला कानमंत्र

0

मुंबई | जग झपाट्याने बदलत आहे त्यामुळे आजकालच्या उद्योजकांनी बदलत्या काळाशी जुळवून घेतले पाहिजे, असे वक्तव्य रतन टाटा यांनी केले आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते.

काळानुरूप विकसनशील देशांतील बदलत्या गरजा या विषयावर त्यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले होते. ऑनलाईन कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते लोकांशी संवाद साधत होते.

पुढे ते म्हणाले की, नवोन्मेष आणि सृजनशीलता हे उद्योगजगताचे आधारस्तंभ असले तरी, उद्योजकांना देशाच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने योग्य वेळी योग्य मार्गदर्शन उद्योजकांना मिळणे आवश्यक आहे.

भारतातील आणि जगातील इतर समस्यांवर बोलताना त्यांनी मानवतावाद संघर्ष, उपासमार आणि जागतिक अन्न तुटवडा यावर आपले मत मांडले. तसेच अवकाशयुगीन आणि अन्य ऍडव्हान्स तंत्रज्ञानाचा वापर व्यवसाय वाढीसाठी केला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

आपण जो व्यवसाय करतोय तो फक्त आपल्या देशापुरता मर्यादित न ठेवता आपल्याला पूर्ण जगाच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. या अनुषंगाने प्रत्येकाचे वर्तन आणि आचरण असले पाहिजे.

नम्रता हा व्यवसाय वाढीचा मूलमंत्र आहे. केवळ मूल्यनिर्मितीसाठी नाही, तर मानव कल्याणासाठी आपण कोणत्या प्रकारे मदत करू शकतो, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे असेही रतन टाटा यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.