महागड्या गाड्यांपासून ते अरबी समुद्राच्या शेजारी शानदार बंगला, वाचा रतन टाटांची लाईफस्टाईल

0

भारतातील उद्योगपती रतन टाटा जसे पैशांनी श्रीमंत आहेत तसेच ते मनानेदेखील श्रीमंत आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल ते ज्या विनम्र पद्धतीने वागतात त्यामुळे ते पुर्ण जगात आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी खुप प्रसिद्ध आहेत.

काही दिवसांपुर्वी ते आपल्या एका आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. त्यानंतर लोकांनी त्यांची खुप प्रशंसा केली होती. कोरोनाकाळात ऐकीकडे सगळ्यांचे हाल होत होते तर रतन टाटांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा एक रूपयाही कापला नाही.

या व्यतिरीक्त रतन टाटा आपल्या लाईफस्टाईलमुळेही चर्चेत असतात. त्यांच्याकडे खुप महागड्या गाड्या आणि प्राईवेट जेट आहे. रतन टाटा यांच्याकडे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मुंबईमध्ये एक आलिशान बंगला आहे.

तो मुंबई शहरातला सगळ्यात महागड्या बंगल्यांपैकी एक आहे. आज आम्ही अशाच पाच त्यांच्या आलिशान वस्तुंबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. रतन टाटा यांच्याकडे शानदार फेरारी कॅलिफोर्निया ही कार आहे.

ही कार भारतात भेटत नाही. रतन टाटांना बऱ्याचवेळा या गाडीसोबत पाहण्यात आले आहे. भारतात या गाडीची किंमत ४.४४ कोटी इतकी आहे. रतन टाटांकडे प्राईवेट जेट आहे त्याचे नाव आहे dassault falcon.

रतन टाटांकडे dassault falcon 2000 फ्रांसमधील प्राईवेट जेट आहे. या प्राइवेट जेटमध्ये दोन इंजिन आहेत. या जेटला खासकरून फ्रांसच्या एक्सपर्ट इंजिनीअर्सची मदत घेऊन बनवण्यात आले आहे.

रतन टाटा यांच्याकडे आणखी एक लक्झरी कार आहे जिचे नाव आहे Maserati quattroporte. एका वेबसाईटच्या महितीनुसार रतन टाटांक़डे इटलीची कंपनी Maserati या कंपनीची लक्झरी कार आहे.

या गाडीची टॉप स्पीड २७० किलोमीटर प्रति तास आहे. भारतात या गाडीची किंमत २.११ कोटी आहे. रतन टाटांच्या महागड्या वस्तूंमध्ये land rover freelander गाडीसुद्धा आहे. भारतात या गाडीची सुरूवातीची किंमत ४३.१४ लाख एवढी आहे.

रतन टाटा यांचा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर एक आलिशान बंगलासुद्धा आहे. या बंगल्यातून अरबी समुद्राचा खुप सुंदर नजारा पाहायला मिळतो. १५ हजार स्केअर फुटात पसरलेल्या या बंगल्याच्या टॉप फ्लोअरवर एक खुप मोठा स्विमींग पुल आहे.

या बंगल्याची किंमत करोडोंच्या घरात आहे. रतन टाटा यांना पुस्तके वाचण्याचा खुप छंद आहे. त्यांना कुत्रे पाळण्याचा छंद आहे आणि ते माऊथ ऑर्गनसुद्धा वाजवतात. रतन टाटा यांना खिशे नसलेले शर्ट घालायला आवडते.

हे शर्ट ते न्यूयॉर्कमधील ब्रुक्स ब्रदर्समधून खरेदी करतात. तर अशी आहे रतन टाटा यांची लाईफस्टाईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.