एकदा वाचा; रतन टाटांनी आपल्या अपमानाचा बदला घेत, एका दगडात ‘कसे’ मारले होते दोन पक्षी…

0

 

रतन टाटा उद्योजगातले खूप मोठे नाव आहे. रतन टाटा टाटा ग्रुपचे चेअरमन आहे. २८ डिसेंबर १९३७ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. पुढे आयुष्यभर ते व्यवसाय करत राहिले. ते निर्णय घेत गेले आणि त्यांना सिद्ध करत राहिले.

आपल्या जिद्दीवर आपल्या मेहनतीने रतन टाटा यांनी भारतात आपली एक वेगळीच ओळख बनवली आहे, तसेच त्यांच्या आयुष्यातले अनेक किस्से प्रेरणा देणारे आहे. असाच रतन टाटा यांच्या आयुष्यतला एक किस्सा आपण जाणून घेणार आहोत, जेव्हा त्यांनी आपली अपमानाचा बदला तब्बल ९ वर्षानंतर घेतला होता.

१९९९ टाटा कंपनीने इंडिका कारला आणून एक वर्ष झाले होते. १९९८ मध्ये लाँच झालेली ही कार कंपनीसाठी काही जास्त फायद्यात ठरली नाही. उलट या कारमुळे टाटा कंपनीलाच मोठे नुकसान झाले. त्यामुळे टाटांनी ही कंपनी विकावी लागत होती.

त्यासाठी कंपनीचा प्रस्ताव रतन टाटा अमेरिकेच्या फोर्ड मोटर कंपनीच्या हेडऑफिसमध्ये प्रस्ताव घेऊन पोहचले. टाटांसोबत कंपनीचे काही शेअर होल्डर्स पण होते. कंपनीच्या चेअरमनसोबत रतन टाटांनी मीटिंग झाली पण या मीटिंगमध्ये टाटा यांचा खूप अपमान झाला.

जर तुम्हाला व्यवसाय येत नाही तर तुमच्या कंपनीने ही कार बनवायची कशाला, सोडा आम्ही हे विकत घेऊन तुमच्यावर उपकार करत आहोत, असे फोर्डचे चेअरमन यांनी म्हणत टाटांचा अपमान केला होता. रतन टाटांना या गोष्टीचा खूप राग आला आणि त्यांनी ती मीटिंग अर्धवट सोडली आणि तिथून निघून आले.

या मीटिंगनंतर त्यांनी टाटा मोटर्सला न विकण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांनी कष्ट घेत पुन्हा या व्यवसायाला सुरुवात केली आणि उंचीचे शिखर गाठले. रतन टाटांच्या मेहनतीमुळे कंपनीला मोठा फायदा मिळत गेला आणि त्यामुळे कंपनीचे जगभरात नाव झाले.

त्यानंतर ती वेळ जेव्हा रतन टाटांना आपल्या अपमानाचा बदला घेता आला. २००८ फोर्ड कंपनी दिवसेंदिवस तोट्यात चालली होती. याचे मुख्य कारण होते जॅग्वार आणि लँड रोवर. त्यामुळे टाटा यांनी फोर्ड कंपनीचे हे दोन्ही भाग विकत घेण्याचा निर्णय घेतला. टाटांनी केलेल्या या डीलनंतर स्वतः कंपनीचे मालक बिल फोर्ड रतन टाटांना म्हणाले होते, तूम्ही आमच्या या कंपन्या घेऊन आमच्यावर उपाकर करत आहे.

असा हा किस्सा होता, ज्यात संयम ठेऊन रतन टाटांनी त्यांच्या अपमानाचा बदला घेतला होता. आयुष्यात संकट येत असतात, पण संयम ठेऊन आपण त्याच्यावर मात केली पाहिजे. वेळ ही बदलत असते, फक्त त्यासाठी आपल्या संघर्ष आणि कष्टाची साथ हवी असते, असे रतन टाटांच्या आयुष्यातल्या या प्रसंगावरून समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.