गरिबांसाठी धावून आले रतन टाटा; लोकांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीला केली मदत

0

 

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा नेहमीच तरुण तरुणींना नवीन उद्योग करण्यासाठी मदत करत असतात. तसेच ते समाजासाठी सुद्धा नेहमी मदतकार्य करत असतात.

आता पुन्हा रतन टाटा एका तरुण व्यवसायिकाच्या मदतीसाठी पुढे आले आहे. रतन टाटा यांनी ठाण्याच्या एका तरुणाला व्यवसायात मदत केली असून त्यामुळे अनेक लोकांना त्याचा फायदा होणार आहे.

ठाण्यातील एका तरुणाने जेनेरिक आधार नावाची एक औषधांची विक्री करणारी कंपनी तयार केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून देशातील गरीब आणि गरजू रुग्णांना स्वस्तात औषधे पुरवले जाणार आहे.

ही कंपनी सुरू करणाऱ्या तरुणाचे नाव अर्जुन पांडे असे आहे. अवघ्या वयाच्या १८ व्या वर्षी या कंपनीची स्थापना केल्याने या तरुणाला थेट रतन टाटांनीच मदतीचा हात दिला आहे.

आता ही कंपनी औषधांची खरेदी थेट उत्पादकांकडून करणार असून औषधे ग्राहकांना विकणार आहे. कोरोनाच्या संकटात अर्जुनने अनेक रुग्णांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला चालना देत तरुणाने ही कंपनी सुरू केली आहे.

ही कंपनी सध्या देशभरातील १०० हुन अधिक शहरात औषधे कमी दरात उपलब्ध करून देत आहे. ही कंपनी ४ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या कंपनीमुळे अनेक लोकांना कोरोनाच्या संकटात रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आहे.

येत्या काही महिन्यांमध्ये या कंपनीचे केंद्र सांगली, सातारा, मिरज, आणि कोल्हापूर तसेच महाराष्ट्राच्या आणि ग्रामीण भागात तयार करण्याची इच्छा अर्जुनची आहे. रतन टाटांनी तर अर्जुनचे काम बघून त्याचे कौतुक करत त्याच्या कंपनीचे शेअर विकत घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.