काय सांगता! या माणसाच्या घरात जन्मले राष्ट्रपती अन् भविष्यात जन्म घेणार पंतप्रधान

0

 

आजकालच्या काळात आई वडील आपल्या बाळाच्या प्रत्येक गोष्टीबाबत खूप उत्साही असतात. बाळ कसे छान दिसेल, त्याचे नाव काय ठेवता येईल याबाबत पण पालकांना खूप उत्सुकता असते.

बाळाच्या नावाबाबत तर ग्रामीण भागात अनोख्या पद्धतीचे कार्यक्रमदेखील ठेवले जातात. अशात उस्मानाबादच्या दत्ता चौधरी यांनी आपल्या मुलाचे नाव ‘राष्ट्रपती’ ठेवल्याने सगळीकडे या एकच विषयाची चर्चा आहे.

ग्रामीण भागात बाळाचे नाव ठेवण्याचा म्हणजेच पाळणा सोहळा कार्यक्रम ठेवण्याची प्रथा खुप जुनी आहे. बाळाच्या कानात फुंकर मारत त्याचे नामकरण केले जाते.

सध्या अनेक नेत्यांची, अभिनेत्यांची नावे आपल्या मुलांना पालक देत असतात. असे असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील चिंचोळी येथील दत्ता चौधरी यांनी आपल्या बाळाचे नाव राष्ट्रपती ठेवले आहे.

दत्ता चौधरी बी. कॉम, डी. एड झालेले सुशिक्षित बेरोजगार आहे. त्यांनी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पण या गोष्टीतुन त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता. त्यामुळे त्यांनी शिकवणी सुरू केली.

१९ जून २०२० ला दत्ता चौधरी आणि कविता चौधरी यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. जेव्हा बाळाच्या नामकरणाची वेळ तेव्हा अनेकांनी देवाचे आणि अभिनेत्यांची नावे सांगितली. पण दत्ता चौधरी यांनी अनोखेच नाव ठेवले. त्यांनी आपल्या मुलाला राष्ट्रपती असे नाव दिले.

राष्ट्रपती देशाचे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. त्या पदाबद्दल संपूर्ण देशाला अभिमान आहे, तसेच त्याचा आदरदेखील आहे. त्यामुळे आपला पण मुलगा भविष्यात राष्ट्रपती व्हावा, अशी दत्ता यांची इच्छा आहे. त्यांनी राष्ट्रपती नावाने आपल्या मुलाचे जन्मप्रमानपत्र आणि आधार कार्ड सुद्धा बनवले आहे.

भविष्यात त्यांना मुलगा झाला तर त्याचे नाव पंतप्रधान ठेवेल आणि मुलगी झाली तर प्रधानमंत्री ठेवेल असे दत्ता चौधरी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.