जाणून घ्या कोण आहे राकेश टिकेत, ज्यांच्या रडण्यामुळे पुन्हा आंदोलनासाठी दिल्लीला परतले शेतकरी

0

 

दिल्लीमध्ये सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन एक वेगळेच वळण घेताना दिसून येत आहे, तर असे असताना काही शेतकरी संघटना या आंदोलनापासून वेगळ्या झाल्या आहे.

२६ जानेवारीला लाल दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे काही शेतकरी नेत्यांनी आपल्या भुमिका बदलल्या होत्या. पण शेतकरी नेता राकेश टिकेत आंदोलन थांबवण्यासाठी तयार नाही. इतकेच नाही तर आंदोलन थांबले, तर मी आत्महत्या करुन घेईल, असे टिकेत यांनी म्हटले होते.

पण तुम्हाला माहितीये का राकेश टिकेत कोण आहे? राकेश टिकेत एकेकाळी दिल्ली पोलिसमध्ये सब-इंस्पेक्टर होते. तसेच ते आज करोडो रुपयांचे मालक आहे.

राकेश टिकेत यांनी आतापर्यंत दोनदा निवडणूक लढवली आहे, पण त्यांना अजून एकदाही विजय मिळाला नाही. शेतकरी नेत्याचा वारसा राकेश टिकेत यांना त्यांच्या वडिलांमुळेच लाभला होता. त्यांचे वडील महेंद्र सिंग टिकेत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष होते.

राकेश टिकेत यांचा जन्म ४ जून १९६९ मध्ये उत्तर प्रदेशच्या सिसौली गावात झाला होता. त्यांनी आपले एम.एचे शिक्षण मेरठ युनिव्हर्सिटीतून पुर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले आणि वकील झाले.

१९९२ मध्ये राकेश टिकेत दिल्लीमध्ये सब-इंस्पेक्टर पदावर होते. त्यावेळी १९९३-९४ मध्ये दिल्लीत महेंद्र सिंग टिकेत यांच्या नेतृत्वखाली आंदोलन सुरु होते.

राकेश टिकेत यांचे वडील महेंद्र सिंग टिकेत असल्याने राकेश यांच्यावर सरकार दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. सरकारचे असे म्हणणे होते की, राकेश टिकेत यांनी आपल्या वडिलांना हे आंदोलन करण्यापासून थांबवावे. त्यामुळे राकेश टिकेत यांनी आपली पोलिसाची नोकरी सोडली होती.

२०१४ ची लोकसभा निवडणूक राकेश टिकेत यांनी लढवली होती. तेव्हा त्यांच्या शपथपत्रानुसार त्यांची संपत्ती ४ कोटी २५ लाख १८ हजार ३८ रुपये इतकी होती. तसेच त्यांच्याकडे त्यावेळी १० लाख रुपये कॅश होती.

Leave A Reply

Your email address will not be published.