खराब झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे नीट करणारा अंतराळात कसा गेला? वाचा राकेश शर्माची कहाणी

0

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांना आज कोण नाही ओळखत. त्यांचे नाव इतिहासाच्या पानात सुवर्णअक्षरात लिहीले गेले आहे. वायुसेना आणि विंग कमांडर राकेश शर्मा यांना अनेक देशातील लोक हिरो मानतात. मजबूत इच्छाशक्ती असणारे आणि महत्वाकांशा असणारे राकेश शर्मा जेव्हा तरूण होते तेव्हा ते खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना ठीक करण्याचे काम करायचे.

आज आम्ही तुम्हाला त्यांची प्रेरणादायी कथा सांगणार आहोत. पंजाबमधील पटियाला येथे त्यांचा जन्म १३ जानेवारी १९४९ रोजी झाला होता. ते लहापणापासूनच अभ्यासात खुप हुशार होते. जेव्हा ते खुपच तरूण होते तेव्हा त्यांनी कसलीही ट्रेनिंग न घेता इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठीक करण्यास सुरूवात केली होती.

टेक्नॉलॉजीशी असलेले त्यांचे नातेच त्यांना अंतराळात घेऊन गेले. त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या निजाम कॉलेजमधून आपले शिक्षण पुर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी १९९६ मध्ये नॅशनल डिफेंस ऍकेडेमी जॉईन केली. १९७० मध्ये त्यांना भारतीय वायुसेनेत नोकरी मिळाली.

१९७१ मध्ये जेव्हा भारताचे पाकिस्तानसोबत युद्ध झाले होते तेव्हा स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा यांनी त्या युद्धात सहभाग घेतला होता. त्यांनी या युद्धात आपल्या मिग लढाऊ विमानाने दुश्मनांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्या धाडसाला आणि साहसाची पुर्ण देशात चर्चा होती.

तेव्हा इंदिरा गांधीनींही त्यांची खुप प्रशंसा केली होती. त्या म्हणाल्या होत्या की राकेश शर्मा एक खरा आणि धाडसी सैनिक आहे. भारत आणि सेवियत युनियनच्या संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष अभियान कॉसमॉससाठी त्यांची १९८२ मध्ये निवड झाली होती.

राकेश शर्मा यांना १९८४ मध्ये या मिशनसाठी सोयूज टी ११ या यानाने अंतराळात पाठवण्यात आले होते. त्यानंतर राकेश शर्मा अंतराळात जाणारे भारताचे पहिले व्यक्ती बनले. राकेश शर्मा यांनी अंतराळात सुमारे ७ दिवस २१ तास ४० मिनिटं घालवली आहेत.

राकेश शर्मा यांनी उत्तर भारताच्या भागाची काही छायाचित्रे काढली. त्यानंतर गुरुत्वाकर्षण नसताना राहण्याची ट्रेनिंग घेतली. जेव्हा राकेश शर्मा अंतराळात होते तेव्हा त्यांनी इंदिरा गांधीशी संपर्क साधला होता. तेव्हा इंदिरा गांधीनी त्यांना विचारले की अंतराळातून भारत कसा दिसतो. तेव्हा राकेश शर्मा म्हणाले की, सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा.

राकेश शर्मा यांच्या या व्हिडीओची क्लीप पुर्ण सोशल मिडीयावर सध्या उपलब्ध आहे. त्यांनी जे उत्तर दिले त्यानंतर ते भारतीयांसाठी हिरो बनले. त्यावेळी त्यांनी भारतीयांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. राकेश शर्मा जेव्हा अंतराळातून भारतात परत आले तेव्हा त्यांना अशोक चक्र देण्यात आले.

सेवियत युनियनने त्यांना हिरो ऑफ द सेवियत युनियनची पद्वी देऊन सन्मानित केले. याव्यतिरीक्त त्यांना आणखी बरेच पुरस्कार मिळाले आहेत. राकेश शर्मा विंग कमांडर पदावर असताना वायुसेनातून निवृत्त झाले.

त्यानंतर एअरक्राफ्ट बनवणारी कंपनी नवरत्न हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमीटेडचे चीफ बनले. आजही भारतीयांच्या मनात त्यांच्यासाठी एक वेगळे स्थान आहे. आजही अनेक देशांतील अंतराळवीर त्यांना हिरो मानतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.