आई मृत्यूच्या दारात होती तरीही कोरोनात जनतेसाठी रात्रंदिवस एक करणारा मंत्री, जाणून घ्या राजेश टोपेंविषयी..

0

राज्यात कोरोनाचे संकट आले होते तेव्हा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. अत्यंत संयमाने त्यांनी बिघडत चाललेली परिस्थिती हातळली होती. पण कोरोनाकाळातच त्यांच्या आईचा मृत्यु झाला होता.

जेव्हा ते जनतेच्या कामात व्यस्त होते तेव्हा त्यांची आई मृत्युशी झुंज देत होती. तरीही राजेश टोपे खचून गेले नाहीत. आज आपण राजेश टोपे यांच्याविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत.

राजेश टोपे यांचे घराणेच मुळात राजकारणातले होते त्यामुळे त्यांना राजकारणात जास्त संघर्ष करावा लागला नाही. त्यांचे वडील अंकुशराव टोपे हे मराठवाड्यातील मोठे नेते होते. ते माजी आमदार आणि माजी खासदार होते.

राजेश टोपेंना फक्त राजकारणात येऊन आपली योग्यता सिद्ध करायची होती. राजेश टोपे यांनी अभियांत्रिकी शाखेतील पदवी घेतली आहे. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

वयाच्या २३ व्या वर्षी ते जिल्हा युवक कॉग्रेसचे अध्यक्ष झाले होते. त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि ते विजयीही झाले. त्यामुळे त्यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे.

ग्रामस्तरावर छोट्या छोट्या समस्यांना कसे सामोरे जायचे ते राजेश टोपेंना चांगले माहित आहे. त्यामुळे कोरोनाकाळात त्यांनी अनेक महत्वाचे छोटे मोठे निर्णय घेतले आणि कोरोनाला आटोक्यात आणले.

जिल्हा परिषदेत विजयी झाल्यानंतर त्यांनी थेट लोकसभा निवडणूक लढवली होती. १९९६ मध्ये त्यांनी ही निवडणक लढवली होती पण पहिल्याच लोकसभा निवडणूकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

पण ते खचून गेले नाहीत. त्यांनी १९९९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ते पाच वेळा निवडून आले.

१९९९ मध्ये जेव्हा ते निवडणूक जिंकले तेव्हा त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. पण त्यांना राजकारणाचा फटका बसला आणि हे पद सोडावे लागले. पण पुन्हा २००१ मध्ये त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले.

१४ वर्षे त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांनी अनेक महत्वाची खाती संभाळली आहेत. वडिलांच्या निधनानंतरही त्यांनी जिंकायची परंपरा ही कायम राखली. राजेश टोपे हे संयमी, शांत स्वभावाचे नेते आहेत.

त्यांनी नेहमी बचावात्मक राजकारण केले आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहणे काहीतरी स्टेटमेंट करणे त्यांना आवडत नाही. कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यावर ते स्टेटमेंट देत नाहीत. त्यांची नेहमी सावध प्रतीक्रिया असते.

राजेश टोपेंसाठी कोरोनाचा काळ हा खुप अवघड होता. कोरोनाचे भयानक संकट ओढवलेले असताना त्यांच्या आई आजारी पडल्या. अशाही परिस्थितीत त्यांनी राज्याला एकटं सोडलं नाही. रात्रंदिवस ते कष्ट करत होते.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतरही त्यांनी आपले पद योग्यरित्या सांभाळले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.